Khadakwasla Dam Agrowon
ताज्या बातम्या

Pune Khadakwasla Dam : पुण्याला पाणी देणाऱ्या खडकवासलामध्ये अद्यापही खडखडाट

Khadakwasla Dam : पुणे शहराला टेमघर, वरसगाव, पानशेत, खडकवासला या चार धरणांतून पाणीपुरवठा केला जातो.

Team Agrowon

Pune Rain Update : पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चार धरणांच्या पाणलोट क्षेत्रात हलका पाऊस होत आहे. त्यामुळे पाण्याची पातळी हळूहळू वाढत आहे. दरम्यान पाणी पातळीत वाढ होत असल्याने खडकवासला धरण प्रकल्पातील चारही धरणांतील पाणीसाठा २७.६७ टक्क्यांवर पोहोचला आहे. पुणे शहराला टेमघर, वरसगाव, पानशेत, खडकवासला या चार धरणांतून पाणीपुरवठा केला जातो.

मंगळवार (ता.११) पर्यंत चार धरणांमध्ये एकूण ८.०७ (टीएमसी) म्हणजेच २७.६७ टक्के पाणीसाठा झाला आहे. मंगळवारपर्यंत खडकवासला धरणात १.०४ टीएमसी (५२.५१ टक्के), पानशेत धरणात २.९९ टीएमसी (२८.११ टक्के), वरसगाव धरणात ३.४८ टीएमसी (२७.११ टक्के) आणि टेमघर धरणात ०.५६ टीएमसी पाणीसाठा आहे. (१५.१५ टक्के) झाले आहे. धरण क्षेत्रात कमी-अधिक प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता आहे.

धरण परिसरात अद्याप जोरदार पाऊस झालेला नाही. त्यामुळेच खडकवासला धरणातून आतापर्यंत नदीत फारसे पाणी सोडण्यात आलेले नाही. गेल्या काही दिवसांपासून धरण परिसरात पाऊस पडत आहे, त्यामुळे पाणीसाठ्यात किंचित वाढ झाली आहे.

नीरा नदीच्या खोऱ्यात येणाऱ्या वीर, भाटघर, नीरा देवघर व गुंजवणी धरणातील पाणीसाठा २३ टक्के असून नीरा नदीच्या खोऱ्यातील धरणांमध्ये ११ टीएमसी पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी या सगळ्या धरणांमध्ये ३६ टक्के पाणी साठा होता. तुलनेत यंदा पाणीसाठा कमी असल्याचे दिसून येत आहे.

वीर धरणाच्या पाण्याने २०१९ नंतर पहिल्यांदाच तळ गाठला आहे. धरणात बुधवारी २१ टक्के म्हणजे २.४० टीएमसी पाणी साठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी याच दिवशी ४७ टक्के पाणी साठा शिल्लक होता. भाटघर धरणात २२.३५ टक्के म्हणजे ५.५० टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे.

गेल्या वर्षी या दिवशी धरणात ३१ टक्के म्हणजे ७.४६ टीएमसी पाणीसाठा शिल्लक होता.नीरा देवघर धरणात २५ टक्के पाणीसाठा म्हणजे ३.१५ टीएमसी असून गेल्या वर्षी या दिवशी २३ टक्के पाणी साठा झाला होता.

गुंजवणी धरणात २३ टक्के पाणी साठा शिल्लक आहे गेल्या वर्षी या दिवशी ४१ टक्के पाणी साठा झाला होता. गेल्या वर्षी चार धरणांचा मिळून ३५ पाणी साठा नीरा नदीमध्ये शिल्लक होता.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Gokul Milk : कोल्हापुरात महाडिक पॅटर्न; आता ‘गोकुळ’ निशाण्यावर

Jalgaon Assembly Election Result 2024 : खानदेशात महायुतीची मुसंडी; काँग्रेसचे दिग्गज पराभूत

Rohit Patil NCP-SP : राज्यातला सर्वात तरूण आमदार राष्ट्रवादीचा; वय अवघे...

Maharashtra Assembly Result 2024 : अहिल्यानगर, नाशिकमध्ये महाविकास आघाडीचा ‘सुपडासाफ’

Food Processing Industry : प्रक्रिया उद्योगात मिळविली ठळक ओळख

SCROLL FOR NEXT