Fruit Production Agrowon
ताज्या बातम्या

Fruit Production : दर्जेदार फळ उत्पादनात छाटणी महत्त्वाची

आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञ रॉड्रिगो ओलिवा यांचे प्रतिपादन

टीम ॲग्रोवन

नागपूर ः ‘‘संत्रा बागेचे (Sweet-Orange Farm) आरोग्य जपत दर्जेदार फळांचे उत्पादन घ्यावयाचे असल्यास त्याकरिता झाडाची तंत्रशुद्ध आणि वेळेवर छाटणी होणे गरजेचे आहे. प्रकाश संश्‍लेषणाची क्रिया योग्य पद्धतीने होण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रयत्न करावे,’’ असे आवाहन आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञ रॉड्रिगो ओलिवा (Rodrigo Olive) यांनी केले.

नाशिक येथील सह्याद्री फार्म, महाऑरेंज, कृषी विभाग यांच्या संयुक्‍त सहकार्याने वनामती (वसंतराव नाईक राज्य कृषी विस्तार व प्रशिक्षण संस्था) येथे आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते. सचिन वाळूंज, महाऑरेंजचे कार्यकारी संचालक श्रीधर ठाकरे, विभागीय कृषी सहसंचालक राजेंद्र साबळे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी मिलिंद शेंडे, मनोज जवंजाळ यांची यावेळी उपस्थिती होती.

रॉड्रिगो ओलिवा पुढे म्हणाले, जागतिकस्तरावर भारतात लिंबूवर्गीय फळपिकांखालील क्षेत्र अधिक आहे. झाडाला अन्न तयार करण्यासाठी प्रकाश संश्‍लेषणाची क्रिया महत्त्वाची ठरते. त्यामुळे झाडांच्या सर्वच भागांना सूर्यप्रकाश मिळाला तर झाडांची निकोप वाढ होते. भारतात मात्र बागेच्या व्यवस्थापनात हा मुद्दा दुर्लक्षित करण्यात आला आहे. झाडांच्या मध्यभागी असलेल्या फांद्यापर्यंत सूर्यप्रकाश पोहोचत नाही.

परिणामी प्रकाश संश्‍लेषणाची क्रिया बाधित होते. त्याकरिता तंत्रशुद्ध पद्धतीने झाडाची छाटणी केली पाहिजे. अन्नद्रव्यांच्या व्यवस्थापनात नव्या पालवीची भूमिका देखील महत्त्वाची राहते. एखादवेळी किडरोगाचा प्रादुर्भाव बागेत वाढला तर पानाचे पृथ्थकरण केले पाहिजे. त्याआधारेच झाडांतील अनेक रोगांचे निदान शक्‍य होते. बागेची पाण्याची गरज लक्षात घेत पाणी देण्यावर भर असावा.

मूळ व खोडाचा संपर्क सातत्याने पाण्याशी असला तर बुरशीजन्य रोग वाढतात. त्यामुळे पाणी व्यवस्थापनही महत्त्वाचे राहते.’’ यावेळी शेतकऱ्यांना स्लाईडशोच्या माध्यमातून देशभरात लिंबूवर्गीय त्यातही मुख्यत्वे संत्रा बागेचे व्यवस्थापनाविषयी माहिती दिली.

सह्याद्री फार्मने घेतला पुढाकार

नाशिक येथील सह्याद्री फार्मने संत्रा प्रक्रिया व निर्यात क्षेत्रात काम करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या पार्श्‍वभूमीवर दर्जेदार संत्रा उत्पादनाविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळावे याकरिता सह्याद्री कडून प्रयत्न होत आहे. त्याच प्रयत्नांचा भाग म्हणून जागतिकस्तरावरील तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहिणींना दोन हप्ते एकदम?; मार्च, एप्रिलचा ७३० कोटी निधी मंजूर

Soybean Seed Treatment: कमी पावसाच्या संकटात सोयाबीन लागवडीपूर्वीचे नियोजन कसे करावे?

Papaya Cultivation: पपई लागवड क्षेत्र १५ हजार हेक्टरवर पोहोचण्याचा अंदाज

Agrowon Podcast: कापसातील तेजी कायम; सोयाबीनमध्ये सुधारणा, कांदा दबावातच तर हळद-हरभरा स्थिर

Water Levels Drop: उन्हामुळे जलसाठ्यात झपाट्याने घट

SCROLL FOR NEXT