Crop Damage Agrowon
ताज्या बातम्या

Crop Damage Compensation : शेतकऱ्यांच्या तत्काळ मदतीची रक्कम द्या

परतीच्या पावसाने खरीप हंगामातील पिकांची दाणादाण उडाली. पंचनाम्यांचा फार्स करण्यापेक्षा शेतकऱ्यांचा अंत न पाहता तत्काळ आर्थिक मदत त्यांच्या बँक खात्यावर वर्ग करावी, अशी मागणी केली जात आहे.

टीम ॲग्रोवन

टाकळीभान : परतीच्या पावसाने खरीप हंगामातील (Kharif Season) पिकांची दाणादाण (Crop Damage) उडाली. पंचनाम्यांचा (Crop Damage Survey) फार्स करण्यापेक्षा शेतकऱ्यांचा अंत न पाहता तत्काळ आर्थिक मदत (Crop Damage Compensation) त्यांच्या बँक खात्यावर वर्ग करावी, अशी मागणी केली जात आहे.

पावसाने शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला गेला आहे. त्यामुळे ऐन दिवाळी सणाला दिवाळे निघाले. शेतकरी रडकुंडीस आला आहे. गोडधोड होणारी दिवाळी भाजी-भाकरीवर साजरी करावी लागली आहे.

नैसर्गिक आपत्तीत शेती पिकांचे नुकसान झाल्यास सरकारने त्यासाठी विमा कवच सुरू केले आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात सरकारने ठरवून दिलेला आर्थिक हिस्सा भरत आहेत. मात्र विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांची लूट केली जात आहे.

केवळ पैसा कमविणे हा विमा कंपन्यांचा हेतू असल्याचे स्पष्ट दिसत आहे. अतिवृष्टीचा कोणताही सर्वे न करता विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना हजार- पाचशे रुपये खात्यात जमा करून क्रूर चेष्टा केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Digital Agriculture School: डिजिटल शेतीशाळेतून शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे मार्गदर्शन

Indigenous Livestock Recognition: ‘उमरडा’ गाईला स्वतंत्र देशी गोवंश, तर माडग्याळ मेंढीला राष्ट्रीय मान्यता

AI in Agriculture: शेती क्षेत्रात ‘एआय-डिजिटल ट्विन’ प्रायोगिक तत्त्वावर राबवविणार

Farmer Aadhar Verification Process: आधार प्रमाणीकरणासाठी विशेष प्रक्रिया

Grape Growers Conference: द्राक्ष बागायतदार संघाचे अधिवेशन; २४ ते २६ ऑगस्टदरम्यान पुण्यात आयोजन

SCROLL FOR NEXT