Electricity Agrowon
ताज्या बातम्या

Electricity Pokhara Project : पोखरा प्रकल्पातील गावांना २४ तास वीजपुरवठा द्या

आमदार प्रवीण पोटे पाटील यांची उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी

Team Agrowon

अमरावती : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत (पोखरा) (Nanaji Deshmukh Krishi Sanjivani Project) गावांमध्ये कृषिपंपांना २४ तास वीजपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी आमदार प्रवीण पोटे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

पत्रानुसार, वातावरणातील बदल, त्यामुळे अनिश्चित पाऊसमान अशा स्थितीत शेतकऱ्यांना पारंपरिक पद्धतीने शेती करणे अवघड झाले आहे. त्या पार्श्‍वभूमीवर शेतकऱ्यांनी पावसाचा ताण सहन करणाऱ्या वाणांची मागणी केली आहे. भारतीय कृषी संशोधन परिषदेने देखील अशा वाणांच्या संशोधनावर नजीकच्या काळात भर दिला आहे. ही जमेची बाजू असली, तरी जागतिक बँकेच्या निधीतून हवामानातील बदल नजरेसमोर ठेवत पोखरा प्रकल्पाची अंमलबजावणी केली जात आहे. या प्रकल्पाच्या निधीतून शेतकऱ्यांनी अनेक कृषिपूरक उद्योग उभारले, काही शेतकऱ्यांनी कृषिपंप, तसेच सिंचनाच्या सोयीसुविधा बळकट केल्या आहेत.

मात्र अशा घटकांना पुरेसा वीजपुरवठा उपलब्ध होत नसल्याने शेतकऱ्यांसाठी प्रकल्पातील या बाबींचा उपयोग करणे अवघड झाले आहे. राज्यात ‘पोखरा’अंतर्गत ५१४२ गावांचा समावेश आहे. अमरावती जिल्ह्यातील खारपाणपट्टा क्षेत्राच्या विकासाच्या दृष्टिकोनातून ५३२ गावे प्रकल्पात समावेशित करण्यात आली. काही वर्षांपासून पावसाची अनिश्‍चितता, सरासरी कमी जास्त पाऊस, पावसाचा खंड, अतिवृष्टी, पावसाची अवेळी हजेरी, गारपीट यांसह हवामानामध्ये बदल होत आहेत. परिणामी, शेतकऱ्यांना हवामानातील दीर्घकालीन प्रतिकूल बदलाचा आघात सोसण्यासाठी आवश्यक हवामान, बी-बियाणे, कृषी विस्तार सेवा, कृषी हवामानविषयक सल्ला, तसेच काढणीपश्‍चात सेवासुविधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध राहील याकरिता हा प्रकल्प २०१८-१९ मध्ये विदर्भ मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये सुरू आहे. परंतु वीजपुरवठ्याअभावी शेतकऱ्यांना योजनेचा अपेक्षित लाभ घेता येत नाही, अशी खंत आमदार पोटे पाटील यांनी व्यक्त केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Hawaman Andaj : राज्यातील गारठा कायम; राज्यातील काही भागातील किमान तापमानात काहिशी वाढ

Maharashtra Assembly Election Result 2024 : राज्यात महायुती सुसाट; भाजप १२, शिंदेसेना ८ आणि अजित पवार गटाचे ८ उमेदवार विजयी

Jowar Sowing : कोरडवाहू क्षेत्रातील ज्वारी पेरणीला गती

Goat Farming : आग्रा येथील राष्ट्रीय चर्चासत्रात अकोल्यातील शेळी उत्पादकाचा सन्मान

Fadnavis, Girish Mahajan, Aditi Tatkare and Rane win : महाराष्ट्रात महायुतीची लाट; फडणवीस, मुंडे, गिरीश महाजन, अदिती तटकरेंसह राणे विजय

SCROLL FOR NEXT