Crop Insurance Agrowon
ताज्या बातम्या

Crop Insurance : ‘प्रोत्साहन’ आज जमा

नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना २०१९ पासून प्रतीक्षा असलेल्या प्रोत्साहन अनुदान वितरणाला अखेर राज्य सरकारला मुहूर्त मिळाला आहे.

टीम ॲग्रोवन

मुंबई : नियमित कर्ज (Crop Loan) भरणाऱ्या शेतकऱ्यांना २०१९ पासून प्रतीक्षा असलेल्या प्रोत्साहन अनुदान वितरणाला अखेर राज्य सरकारला मुहूर्त मिळाला आहे. आज (ता. २०) हे अनुदान साडेसात लाख शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. या अनुदान वितरणाचे श्रेय घेण्यासाठी सरकारी पातळीवर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

मंत्रालयातील सातव्या मजल्यावरील दालनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हे वितरण होईल. नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्यासाठी २०१७-१८, २०१८-१९ आणि २०१९-२० या आर्थिक वर्षात नियमित कर्जफेड केलेल्या साडेसात लाख शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण करण्यात आले आहे. या तीन आर्थिक वर्षांपैकी कोणत्याही दोन आर्थिक वर्षांत पीक कर्जाची उचल करून नियमित परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येईल.

श्रेयवादासाठी धडपड

कर्जमुक्ती योजना ठाकरे सरकारच्या काळात आली. प्रोत्साहन अनुदानाची योजना कोरोनामुळे रखडली. आता ही योजना मार्गी लागल्याने त्याचे श्रेय घेण्यासाठी शिंदे-भाजप सरकारने मोठा कार्यक्रम करण्याचे नियोजन केले होते. मात्र, अचानक मंत्रालयात छोटेखानी कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. साडेसात लाख शेतकऱ्यांना होणार फायदा

थोडक्यात म्हहत्त्वाचे...

२०१९ मध्ये अतिवृष्टी व महापूरामुळे नुकसान झाल्याने नैसर्गिक आपत्ती अंतर्गत कर्जमाफीचा लाभ मिळालेले शेतकरीसुद्धा या योजनेस पात्र.

एखादा शेतकरी मयत झाल्यानंतर त्यांच्या वारसांनी कर्जाची परतफेड केली असल्यास वारस सुद्धा पात्र केवळ राष्ट्रीयकृत बँका, खासगी बँका, ग्रामीण बँका, जिल्हा सहकारी बँका व विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांनी शेतकऱ्यांना दिलेले अल्पमुदत पीक कर्ज.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचा 344.74 कोटीं निधी वळवला

Silkworm Monsoon Care: पावसाळ्यात रेशीम अळी संगोपन करताना घ्यावयाची काळजी

Kisan Credit Card: किसान क्रेडिट कार्ड : मत्स्य व्यवसायासाठी आर्थिक सक्षमीकरण

Monsoon Parasite Control: पावसाळ्यातील परजीवी कीटकांचे एकात्मिक व्यवस्थापन

Animal Health Protection: पशू, मानव आरोग्याचे संरक्षण

SCROLL FOR NEXT