Ghodganga Sugar Factory  Agrowon
ताज्या बातम्या

Ghodganga Sugar Factory : ‘घोडगंगा’ समोर आज बोंबाबोंब आंदोलन

शिरूर तालुक्यातील न्हावरे येथील रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याने पार पडलेल्या गळीत हंगामातील एफआरपीनुसार उर्वरित थकीत बिल तातडीने जमा करावीत.

Team Agrowon

Pune Indistry News : शिरूर तालुक्यातील न्हावरे येथील रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याने (Ghodganga Sugar Factory) पार पडलेल्या गळीत हंगामातील एफआरपीनुसार उर्वरित थकीत बिल तातडीने जमा करावीत.

यासाठी आज (ता. १) सकाळी १० वाजता कारखान्यासमोर बोंबाबोंब आंदोलन करणार असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष राजेंद्र ढमढेरे व इतर पदाधिकाऱ्यांनी निवेदनाद्वारे कारखाना प्रशासनाला दिला आहे.

निवेदनात म्हटले आहे, की कारखान्याने २०२२ - २०२३ या कालावधीत गळितासाठी नेलेल्या शेतकऱ्यांचे उसाचे बिल थकीत असून, ते तातडीने जमा करावे. १५ जानेवारी ते ६ फेब्रुवारीदरम्यान गळितासाठीच्या उसाचे बिल २ हजार रुपये प्रतिटनप्रमाणे जमा केले असून, उर्वरित बिलाची रक्कम तातडीने जमा करावी.

६ फेब्रुवारी ते ६ मार्चपर्यंतची संपूर्ण रक्कम तत्काळ शेतकऱ्यांच्या खात्यांवर जमा करावी, कामगारांचे वर्षभरापासून पगार थकले आहेत ते तत्काळ जमा करावेत, कामगारांचे विमा पॉलिसीचे हप्तेही बंद पडले आहेत. त्यामुळे कामगारास विमा रक्कम मिळण्यास अडचण होत आहे.

तरी विमा पॉलिसीचे हप्ते सुरळीत भरावेत, ऊसतोड तसेच ऊसवाहतूक कंत्राटदारांची उर्वरित मस्टर बिले द्यावीत आदी मागण्या निवेदनाद्वारे केल्या आहेत. यावेळी अध्यक्ष राजेंद्र ढमढेरे, सुनील ढमढेरे, दिलीप खैरे, रामभाऊ जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

West Asia trade : युद्ध दीर्घकाळ सुरु राहील तर भारताची शेतमाल निर्यात धोक्यात; जीटीआरआयच्या अहवालात महत्त्वाचा इशारा

Crude Oil Prices: युद्धामुळे महागाईचे सावट, कच्च्या तेलाचे दर चार वर्षांतील उच्चांकावर

Wildlife Conflict: डोंगरपट्ट्यात ‘रब्बी’ नामशेष होण्याच्या अवस्थेत

Agriculture Festival: कृषी, धान्य महोत्सवाला अत्यल्प प्रतिसाद

Women Empowerment: महिलांनी प्रत्येक क्षेत्रात आत्मविश्वासाने पुढे यावे

SCROLL FOR NEXT