Crop Insurance Agrowon
ताज्या बातम्या

Crop Insurance : पिक विम्यासाठी तातडीने सर्व्हेक्षण करा, गिरीष महाजनांच्या सूचना

Dhule Kharif Season : धुळे जिल्ह्यातील खरीप हंगामातील पिकांची वाढ खुंटलेली असून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.

sandeep Shirguppe

Pik Vima Scheme : धुळे जिल्ह्यातील काही महसूल मंडळात मागील २१ ते २३ दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. यामुळे जिल्ह्यातील खरीप हंगामातील पिकांची वाढ खुंटलेली असून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. जिल्हा प्रशासनाने सर्वेक्षण करुन पिक विम्यासाठी अधिसूचना निर्गमित करण्याची कार्यवाही जलदगतीने करण्याच्या सूचना ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या.

यावेळी महाजन म्हणाले की, राज्य सरकारच्या सर्व समावेशक प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या माध्यमातून धुळे जिल्ह्यातील २ लाख ४६ हजार ८४७ शेतकऱ्यांनी १ रुपया भरून कापूस, उडीद, मूग, सोयाबीन, ज्वारी, मका आदि पिकांचा पिक विमा काढला आहे. पिक विम्याच्या शासन निर्णयानुसार प्रतिकूल हवामान परिस्थितीच्या निकषांनुसार २५ टक्के नुकसान भरपाईची रक्कम अग्रिम स्वरूपात देण्यात येते.

त्यानुसार जिल्ह्यातील पावसाचा अहवाल संकलित करून धुळे जिल्ह्यातील ज्या महसूल मंडळांमध्ये मागच्या २१ दिवसात फक्त २.५ मी.मी पेक्षा कमी पाऊस पडला आहे. संबंधित महसूल मंडळातील शेतकऱ्यांच्या पिकांचे सर्व्हेक्षणाबाबत २५ टक्के अग्रिम स्वरूपात नुकसान भरपाई देण्यासाठी जिल्हा प्रशासन, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व विमा कंपनीच्या प्रतिनिधींनीनी जलदगतीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

त्याचप्रमाणे कृषी विभाग, महसूल विभाग व संलग्न सर्व विभाग यांनी पाऊस लांबला असल्यामुळे टंचाई परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन शेती पिकांच्या नुकसानीबरोबर, जिल्ह्यातील पाणी टंचाई निवारणासाठी कार्यवाही करावी. तसेच सद्यस्थितीत धरणातील आरक्षित पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन करावे अशा सूचना महाजन यांनी दिल्या.

तसेच अवैधरित्या पाण्याचा उपसा थांबविण्यासाठी तहसिलदार, उप अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा, पाटबंधारे विभागातील अधिकारी, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मधील अधिकारी यांचे गस्तीपथक नेमून तालुकास्तरावर टंचाई निवारण समित्यांनी नियमित बैठका घेणेबाबत देखील निर्देश देण्यात यावेत.

शेतीच्या नुकसानीच्या सर्व्हेक्षणाबरोबरच संभाव्य टंचाई परिस्थिती संदर्भात शासनस्तरावरून योग्य ते सहकार्य केले जाईल असेही पालकमंत्री महाजन यांनी सांगितले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fardad Kapus: फरदड कापसाचे पीक का घेऊ नये?

Fish Rate: बाजारात ताज्या मासळीचे दर तिप्पट

Sugarcane Bill: निळकंठेश्वर कारखान्यातर्फे चोवीस कोटी ३५ लाखांचे ऊसबिले अदा

PA Retirement Farewell:...अन् जिल्हाधिकारी झाले बॉडीगार्ड !

Sand Mining: नदीपात्रात वाहने उतरविल्याने वाळू उपशाला स्थगिती

SCROLL FOR NEXT