Department Of Agriculture Agrowon
ताज्या बातम्या

Agriculture Department : ज्येष्ठता यादीतील वरिष्ठांना डावलून कनिष्ठांना पदोन्नती

नागपूर विभागातील प्रकार; आयुक्तालय दखल घेईना

Team Agrowon

ॲग्रोवन वृत्तसेवा
वर्धा ः कृषी पर्यवेक्षक (Agriculture Supervisor) संवर्गातून नागपूर विभागात समावेशित अशोक जिभकाटे व रवींद्र राऊत यांना सेवा ज्येष्ठतेनुसार पदोन्नती देण्यासंदर्भात विभागीय पदोन्नती समितीची ९ आणि १० डिसेंबर २०२१ रोजी ही बैठक झाली. त्यानुसार पदोन्नतीचा प्रस्ताव सादर केला गेला.

आता १८ नोव्हेंबर २०२२ च्या कृषी पर्यवेक्षक ते कृषी अधिकारी गट ब (क) या पदोन्नतीच्या आदेशातून या सेवाज्येष्ठ दोन कर्मचाऱ्यांचीच नावे वगळण्यात आल्याचा धक्‍कादायक प्रकार समोर आला आहे.

विशेष म्हणजे या दोन्ही कर्मचाऱ्यांपेक्षा कनिष्ठ असलेल्यांना मात्र पदोन्नती देण्यात आली आहे.
कृषी आयुक्‍तालयाने सेवा ज्येष्ठतेनुसार पदोन्नतीची माहिती ७ फेब्र्रुवारी २०२३ रोजी मंत्रालयातील कृषी व पशुसंवर्धन विभागाच्या कक्ष अधिकाऱ्यांना सादर केली.

त्याकरिता ९-१० डिसेंबर २०२१ रोजीच्या पदोन्नती समितीच्या बैठकीचा हवाला देण्यात आला आहे.

नागपूर विभागातील २००४ व २०१० च्या ज्येष्ठता यादीनुसार कृषी पर्यवेक्षकांना पदोन्नतीस पात्र ठरविण्यात आले होते. २०१० च्या यादीनुसार जिभकाटे, राऊत यांच्यासह गेंदलाल उईके, सूर्यकांत माने व आशिष गोंदेवार यांचा समावेश होता.

परंतु तांत्रिक मुद्दे विचारात घेत यातील जिभकाटे व राऊत यांचीच पदोन्नतीसाठी शिफारस करण्यात आली.

नोव्हेंबर २०२२ मध्ये राज्यातील ३२४ तर नागपूर विभागातील ६७ जणांना कृषी पर्यवेक्षक ते कृषी अधिकारी गट ब (क) या श्रेणीत पदोन्नती देण्यात आली. परंतु या यादीतून पदोन्नतीसाठी पात्र जिभकाटे व राऊत यांना डावलल्याचा आरोप आहे.

याउलट सेवाज्येष्ठतेत खाली असलेल्या कृषी पर्यवेक्षकांना मात्र पदोन्नती देण्यात आली आहे.

त्यामध्ये विजय काळे, बंडेराव गोरखेडे, नरेश हरीनखेडे, नरेश धावडे, सुरेश धांडे यांचा समावेश आहे. पदोन्नतीपासून वंचित ठेवण्यात आलेल्या या दोन्ही कर्मचाऱ्यांनी याबाबत सातत्याने आयुक्‍तालयस्तरावर पाठपुरावा चालविला आहे.

मात्र त्याची कोणत्याच प्रकारची दखल घेण्यात आली नाही, असा आरोप त्यांनी केला आहे.

तांत्रिक कारणामुळे पदोन्नतीची प्रक्रिया रखडली होती. या संदर्भातील त्रुटी दूर करून शासनाला प्रस्ताव पाठविला आहे. या दोन्ही कर्मचाऱ्यांना ते पात्र असलेल्या तारखेपासूनच पदोन्नती देण्यात येईल.
- सुधीर ननावरे, सहसंचालक (आस्थापना),
कृषी आयुक्तालय, पुणे

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT