Paddy Farming Agrowon
ताज्या बातम्या

Horticulture Development : कृषी विभागाकडून फळपिकाला धान उत्पादकपट्ट्यात प्रोत्साहन

Paddy Farming : हंगामात कमी होणारे धानाचे दर त्यामुळे उत्पादकता खर्चाची कशीबशी होणारी भरपाई या पार्श्‍वभूमीवर शेतकऱ्यांकडून पर्यायी पिकांचा विचार सातत्याने होतो.

Team Agrowon

Bhandara News : हंगामात कमी होणारे धानाचे दर त्यामुळे उत्पादकता खर्चाची कशीबशी होणारी भरपाई या पार्श्‍वभूमीवर शेतकऱ्यांकडून पर्यायी पिकांचा विचार सातत्याने होतो.

कृषी विभागाने देखील शेतकऱ्यांना पीक फेरपालटासाठी प्रोत्साहन देत त्यांना फळबाग लागवडीकडे वळविण्याचा प्रयत्न चालविला आहे. त्याअंतर्गत सिंदीपार येथील सहा शेतकऱ्यांनी १.१० हेक्‍टरवर विविध फळपिकांची लागवड केली आहे.

पीक फेरपालटाअभावी धानाची उत्पादकता सातत्याने कमी होत असून बाजारात दरही अपेक्षित मिळत नाही. त्यामुळे पर्यायी पिकांसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न कृषी विभागाकडून होत आहे. त्यानुसार सिंदीपार येथील सुरेश टेंभुर्णे, चंद्रशेखर टेंभुर्णे, राजेश येळेकर, सुखदेव येळेकर, यादोराव कोचे यांनी प्रत्येकी ०.२० हेक्‍टर, तर आत्माराम टेंभुर्णे यांनी ०.१० हेक्‍टर फळबाग लागवड केली आहे.

सिंदीपार येथील उपसरपंच तसेच प्रयोगशील शेतकरी चंद्रशेखर टेंभुर्णे यांनी सुरुवातीला पुढाकार घेतला. लाखनी तालुका कृषी अधिकारी किशोर पात्रीकर यांच्या मार्गदर्शनात कृषी सहाय्यक विक्‍की वंजारी यांच्या सहकार्यातून अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला होता. त्यानंतर फळबाग लागवडीचा निर्णय घेण्यात आला.

महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत घन लागवड ५ बाय ५ मीटर अंतरावर २० आर क्षेत्रात ८० झाडे याप्रमाणे लागवड करण्यात आली आहे. मुंडीपार येथील तीन शेतकऱ्यांच्या माध्यमातून १.०५ हेक्‍टर, मोरगाव येथील ९ शेतकऱ्यांद्वारे २.२५ हेक्‍टर, सिंदीपार येथील दोन शेतकरी ०.५५ व परसोडी येथील २ शेतकऱ्यांकडून ०.६५ याप्रमाणे १६ शेतकरी यावर्षी फळपीक लागवडीसाठी पुढे आले आहेत. त्यांचे अनुदान प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon Delay: मॉन्सूनच्या विलंबाने खरीप हंगामाला फटका

SMART Rooftop Solar Scheme: अवघ्या २५०० रुपयांत सौर प्रकल्प

Kharif Sowing: मराठवाड्यात खरीप पेरणी अद्याप रखडलेलीच

Jal Jeevan Mission: ‘जलजीवन’ ठप्प; ४०० कोटींची गरज

Crop Insurance Compensation: पीकविम्याची रक्कम दहा दिवसांत द्या; अन्यथा सरण आंदोलनाचा शेतकऱ्यांचा इशारा

SCROLL FOR NEXT