Soybean & Cotton Agrowon
ताज्या बातम्या

सोयाबीन, कापसाची उत्पादकता घटणार

सोयाबीन (Soybean), कापूस (Cotton) व तूर ही जिल्ह्यातील खरीप हंगामातील मुख्य पिके आहेत. २ लाख ४२ हजार हेक्टरवर सोयाबीन व २ लाख ३५ हजार हेक्टरमध्ये कापसाची पेरणी झाली.

ॲग्रोवन वृत्तसेवा

अमरावती : खरीप हंगामात ९० टक्के पेरण्या आटोपल्या असताना जुलैतील अतिवृष्टीने तब्बल १ लाख ३२ हजार हेक्टर क्षेत्रातील पिके उद्‍ध्वस्त (Crop Damage) झाली आहेत. या क्षेत्रातील शेतजमीनच खराब झाल्याने पुन्हा पेरणीची शक्यता धूसर आहे. संभाव्य नुकसानभरपाईने हंगामातील नुकसान भरून निघेल का, असाही प्रश्‍न उपस्थित झाला आहे. सोबतच जिल्ह्यातील शेतमालाच्या उत्पादनाची सरासरी घसरण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यातील १४ तालुक्यांतील खरिपातील पेरण्या आता जवळपास आटोपल्या आहेत. जुलैअखेर ९० टक्के क्षेत्रात पेरणी झाल्याचा अहवाल कृषी विभागाने (Agriculture Department) दिला आहे. सोयाबीन (Soybean), कापूस (Cotton) व तूर ही जिल्ह्यातील खरीप हंगामातील मुख्य पिके आहेत.

२ लाख ४२ हजार हेक्टरवर सोयाबीन व २ लाख ३५ हजार हेक्टरमध्ये कापसाची पेरणी झाली. तर एक लाख २ हजार हेक्टर क्षेत्र तुरीखाली आले आहे. मुगाची पेरणी ७३३४ व उडीद १६०० हेक्टरमध्ये आहे.

या वर्षी ५, १०, १८ व १९ जुलैला जिल्ह्यात अतिवृष्टीने कहर केला. यामध्ये तब्बल एक लाख ३२ हजार हेक्टर क्षेत्रातील पिकांची नासाडी झाली. नुकत्याच आटोपलेल्या पेरण्या दडपल्या गेल्यात, तर काही भागांत शेतात पाणी साचल्याने नुकतेच उगवलेले पीक पिवळे पडून वाया गेले.

कोरडवाहू पट्टा अधिक असल्याने निसर्गावर अवलंबून असलेल्या शेतांत एकरी ५ ते ६ क्विंटल सोयाबीन होते. तर कापसाची स्थितीही अशीच आहे. आता पाऊस थांबला नाही, तर ही उत्पादकताही कमी होऊ शकते. पावसामुळे १ लाख ३२ हजार हेक्टर क्षेत्रातील ही दोन्ही पिके आताच हातची गेली आहेत. त्यामुळे जिल्ह्याच्या एकूण उत्पादकतेवर परिणाम होणार आहे, असा अंदाज शेतीतज्ज्ञांचा आहे.

‘आकाशच फाटले, ठिगळ कुठे कुठे लावायचे?’

शासनाकडून नुकसानग्रस्तांना हेक्टरी १० ते १५ हजार रुपये मदत मिळेल, अशी अपेक्षा आहे. मात्र या भरपाईने झालेले नुकसान भरून निघणारे नाही, अशा शेतकऱ्यांच्या व्यथा आहेत. आकाशच फाटले तर ठिगळ कुठे कुठे लावायचे, अशी खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

NHB Subsidy Cut: लेखाजोखा ‘एनएचबी’चा!

AI in Agriculture: कृषीतील एआय, रोबोटिक्स, ड्रोन तंत्रज्ञानाला नवी दिशा

POCRA Project Audit: ‘पोकरा’ प्रकल्पाचे पूर्ण लेखापरीक्षण करा: किशोर तिवारी

Women’s Freedom and Equality: स्त्रीला जोखडात बांधणारी विचारसरणी उखडून फेका: राहुल गांधी

Kharif Crop Growth: खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील पिके बहरली

SCROLL FOR NEXT