Agriculture Irrigation Agrowon
ताज्या बातम्या

Agriculture Irrigation : चार साठवण तलाव निर्मितीस प्राधान्य देऊ

विष्णुपुरी प्रकल्पाबाबत आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी पंप दुरुस्तीसंदर्भात मांडलेल्या लक्षवेधीवर अशोक चव्हाण यांनी एक उपप्रश्न उपस्थित करत या प्रकल्पासंदर्भातील अनेक महत्त्वाच्या बाबी विधानसभेच्या निदर्शनास आणून दिल्या.

Team Agrowon

Nanded News : विष्णुपुरी प्रकल्पातून (Vishnupuri Project) राखून ठेवलेल्या पाण्यामुळे शेतकऱ्यांना सिंचनासाठी (Agriculture Irrigation) पाणी उपलब्ध होत नाही. हा प्रश्न मार्गी लावायचा असेल तर लोहा व कंधार तालुक्यात प्रस्तावित चार साठवण तलाव तत्काळ पूर्ण करणे गरजेचे असल्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी गुरुवारी (ता. २३) विधानसभेत लक्षात आणून दिले. यास सकारात्मक उत्तर देत चार साठवण तलाव निर्मितीस प्राधान्य देऊ, असे आश्वासन तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

विष्णुपुरी प्रकल्पाबाबत आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी पंप दुरुस्तीसंदर्भात मांडलेल्या लक्षवेधीवर अशोक चव्हाण यांनी एक उपप्रश्न उपस्थित करत या प्रकल्पासंदर्भातील अनेक महत्त्वाच्या बाबी विधानसभेच्या निदर्शनास आणून दिल्या. ते म्हणाले की, या प्रकल्पाची साठवण क्षमता साठवण क्षमता ८३.५५ दलघमी असून, बिगर सिंचनासाठी तब्बल ५६.९४ दलघमी पाणीसाठा आरक्षीत आहे.

त्यामुळे या प्रकल्पात शेतीसाठी केवळ २६.६१ दलघमी पाणी शिल्लक राहते. या शिल्लक साठ्यातून शेतीत पीक घेण्यासाठी पाणी पाळ्या देऊ शकत नाही. यावर पर्याय म्हणून लोहा व कंधार तालुक्यातील डोलारा मध्यम प्रकल्प, गुंडा (उमरा) साठवण तलाव, हिंदोळा साठवण तलाव आणि लाटखुर्द साठवण तलाव हे नवीन प्रकल्पाचे काम हाती घेणे आवश्यक आहे.

या प्रकल्पांच्या मान्यतेची प्रक्रिया तातडीने पूर्ण करून ते मार्गी लावल्यास पाण्याची वाढती मागणी पूर्ण होऊ शकेल. त्याचप्रमाणे निर्माणाधीन किवळा साठवण तलाव प्रकल्पाचे काम वेगाने पूर्ण केल्यास तिथूनही पाणी उपलब्ध होईल, असे अशोक चव्हाण यावेळी म्हणाले.

‘तालुक्यातील चार प्रकल्प पूर्ण केले जातील’

चव्हाण यांच्या मागणीला उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद देत. ते म्हणाले की, लोहा व कंधार तालुक्यातील चार प्रकल्प पूर्ण केले जातील.

हिंदोळा आणि लाटखुर्द साठवण तलावाला पाणी उपलब्धता प्रमाणपत्र मिळाले असून, ते काम प्राधान्याने केले जाईल. डोलारा आणि गुंडा साठवण तलावाबाबत काही मुद्दे उपस्थित झाले आहेत. त्याचा निपटारा झाल्यानंतर त्याबाबतही निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orchard Water Management: पाण्याच्या उपलब्धतेनुसार अतिघन बागेचे नियोजन

Soybean Crop Management: सोयाबीनमधील फुलगळीची कारणे जाणून उपाययोजना आवश्‍यक

Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर होणार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Indian Oil Trade: कच्च्या तेलाची आयात; पॅकबंद तेलाची निर्यात

India US Trade: अमेरिकेपुढे झुकण्याची घोडचूक नको

SCROLL FOR NEXT