Devendra Fadnavis agrowon
ताज्या बातम्या

Devendra Fadnavis : “अरे.. तुम्ही तेच ते प्रश्न ?” पत्रकाराच्या शेतकऱ्यांच्या प्रश्नाला फडणवीसांचे उत्तर; म्हणाले, “सप्लाय वाढल्याने…”

Kharif Season Meeting : खरीप पूर्वहंगाम बैठकीनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच, जलयुक्त शिवार योजनेचे नियोजन केल्याचं त्यांनी सांगितलं.

Team Agrowon

Kharif Season Review Meeting : कांदा आणि ट्रोमॅटोचे भाव पडल्याने शेतकरी संतप्त आहे. नाफेडमार्फत कांदा खरेदी करण्याच्या मागणीसाठी शेतकरी आक्रमक आहेत. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय खरीप हंगाम पूर्व आढावा बैठक पार पडली. या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली.

यावेळी पत्रकारांनी शेतमालाला भाव मिळत नसल्याचा प्रश्न उपस्थित करताच अरे.. तुम्ही तेच ते प्रश्न विचारता. सप्लाय वाढल्याने भाव पडले आहेत. तरी शेतकऱ्यांना मदत करण्यास सरकार तयार आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.

फडणवीस म्हणाले, कांद्याला महाराष्ट्रात जे अनुदान दिले जाते. ते अनुदान इतर राज्यांच्या तुलनेत सर्वात जास्त आहे. तरी उत्पादन जास्त झाल्याने मागणीपेक्षा पुरवठा अधिक होतो. त्यामुळे पिकांचे भाव पडतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी इतर पिकांकडेही लक्ष दिले पाहिजे. शेतकऱ्यांना मदत करण्यास सरकार तयार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलू नये, असे आवाहन केले आहे.

जलयुक्त शिवार योजनेबद्दल माहिती देताना फडणवीस यांनी सांगितले की, जलयुक्त शिवार २.० ची सुरुवात केली जाणार आहे. मान्सूनचा पाऊस येणार असल्याने राज्यात जलसंधारणाची कामे जलद गतीने करायची आहे. त्यासाठी जुनी स्ट्रक्चर दुरुस्ती, नाला खोलीकरण अशी कामे केली पाहिजे. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला पाहिजे. सर्व जिल्ह्यांतील जलसंधारणाच्या कामांचा आढावा घेण्यात आला आहे. अनेक ठिकाणी कामे सुरू आहे. काही ठिकाणी लवकरच कामे सुरू केली जातील.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Procurement Date Extension : कापूस खरेदीला १५ मार्चपर्यंत मुदतवाढ; शेतकऱ्यांसाठी सीसीआयचा महत्वाचा निर्णय

Sugarcane FRP: ऊस उत्पादक शेतकऱ्यांची ४,६०१ कोटी एफआरपी थकीत, ४५ कारखाने रडारवर

Raisin Export: बेदाणा निर्यात ८१ टक्क्यांनी घटली, द्राक्ष उत्पादक संकटात; सरकारची कबुली

Bageshwari Lake: बागेश्वरी तलाव परिसर पर्यटनाचे नवे केंद्र

Maize Procurement: मक्याचे दर घसरले; २५ हजार क्विंटल खरेदीवर ब्रेक

SCROLL FOR NEXT