MPKV, Rahuri  Agrowon
ताज्या बातम्या

MPKV Rahuri : ‘जॉइंट अॅग्रेस्को’त संशोधित वाण, अवजारे, शिफारशींचे सादरीकरण

Joint Aggresco : राज्यातील चारही कृषी विद्यापीठातील संशोधनाबाबत चर्चा करून मान्यता देण्यात येण्यासाठी दरवर्षी एका कृषी विद्यापीठात संयुक्त कृषी संशोधन आणि विकास समिती बैठक (जॉइंट अॅग्रेस्को) घेतली जाते.

सूर्यकांत नेटके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Nagar News : राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठात सुरू असलेल्या ५१ व्या संयुक्त कृषी संशोधन आणि विकास समिती बैठकीत (जॉइंट अॅग्रेस्को) शुक्रवारी (ता. २६) दुसऱ्या दिवशी मान्यतेसाठी ठेवलेल्या संशोधित वाण, कृषी अवजारे आणि शिफारशींवर चर्चा करून सादरीकरण करण्यात आले.

या तांत्रिक बाबीवर चर्चा करण्यासाठी कुलगुरू, संशोधन संचालकांच्या अध्यक्षतेखाली ८ समित्या स्थापन केल्या होत्या. सायंकाळी उशिरा चार समित्यांनी पुन्हा त्यावर चर्चा केली. आता शनिवारी (ता. २७) शेवटच्या दिवशी वाण, अवजारे व शिफारशींच्या मान्यतेबाबत निर्णय जाहीर केला जाईल.

राज्यातील चारही कृषी विद्यापीठातील संशोधनाबाबत चर्चा करून मान्यता देण्यात येण्यासाठी दरवर्षी एका कृषी विद्यापीठात संयुक्त कृषी संशोधन आणि विकास समिती बैठक (जॉइंट अॅग्रेस्को) घेतली जाते. यंदा राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठात गुरुवारपासून (ता. २५) ही बैठक सुरू आहे.

यंदा महात्मा फुले कृषी विद्यापीठाने संशोधित केलेल्या शेत व चारा पिकांचे ५ वाण, फळ पिकाचे १ वाण, ३ यंत्रे व ७४ शिफारशी, दापोली कृषी विद्यापीठाने संशोधित केलेल्या शेत व चारा पिकांचे २ वाण, फळ पिकाचे १ वाण व ३८ शिफारशी, परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने संशोधित केलेल्या शेत व चारा पिकांचे ४ वाण, फळ पिकांचे २ वाण,

५ यंत्रे व ४६ शिफारशी, अकोला कृषी विद्यापीठाने संशोधित केलेल्या शेत व चारा पिकांचे ३ वाण, फळ पिकांचे २ वाण, ५ यंत्रे व ७५ शिफारशी अशा एकूण २० वाण, १३ यंत्रे व २३३ शिफारशी यंदाच्या जॉइंट अॅग्रेस्कोमध्ये मांडलेल्या आहेत. शुक्रवारी दुसऱ्या दिवशी यावर चर्चा करून सादरीकरण केले.

त्यासाठी अकोला विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांच्या अध्यक्षतेखालील समितीसमोर शेतपीके, पीक सुधार धोरणे या विषयावर, परभणी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्रमणी यांच्या अध्यक्षतेखालील समितीसमोर नैसर्गिक साधन व्यवस्थापन, परभणी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर यांच्या अध्यक्षतेखाली समितीसमोर उद्यानविद्या,

फलोत्पादन, अकोला विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे यांच्या समितीसमोर पशुविज्ञान आणि मत्स, राहुरी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. सुनील गोरंटीवार यांच्या समितीसमोर सामान्य ज्ञान, अन्न शास्त्र आणि तंत्रज्ञान, दापोली विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय सावंत यांच्या समितीसमोर पीक संरक्षण, कीटकशास्त्र, रोगशास्त्र, रेशीम,

कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील यांच्या समितीसमोर कृषी अभियांत्रिकी, कृषी परिषदेचे महासंचालक रावसाहेब भागडे यांच्या समितीसमोर समाजशास्त्र, संख्याशास्त्र, अर्थशास्त्र आदी बाबीचे सादरीकरण करण्यात आले. त्या त्या विभागाचे शास्त्रज्ञ व चारही कृषी विद्यापीठांचे समन्वयक उपस्थित होते.

कुलगुरूंच्या समितीच्या बैठका

महात्मा फुले कृषी विद्यापीठात दिवसभराच्या सादरीकरणानंतर संध्याकाळी ६ वाजता शेतीपिकांचे नवीन वाण मान्यतेसाठी डॉ. शरद गडाख यांच्या अध्यक्षतेखालील समिती, डॉ. संजय सावंत यांच्या अध्यक्षतेखाली फळपिके, भाजीपाला मान्यतेखालील समिती व कृषी अवजारे मान्यतेसाठीची डॉ. पी. जी. पाटील यांची समिती आणि जैविक अजैविक ताण सहन करणारे जिवाणू मान्येतबाबतची कुलगुरू डॉ. इंद्रमणी यांच्या अध्यक्षतेखालील समितीची रात्री उशिरापर्यंत बैठक झाली. कृषी सचिव एकनाथ डवले यांनाही आज जॉइंट अॅग्रेस्कोला भेट दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon 2026 In Kerala : मॉन्सूनचं २६ मे रोजी केरळात होणार आगमन; हवामानशास्त्र विभागाचा अंदाज

Monsoon Arrival 2026: माॅन्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान; मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात ५ दिवस पावसाची शक्यता

MSP Hike 2026: शेतीमालांच्या हमीभावाची वाढ अत्यंत तोकडी

Khat Dukan Karvai: : कृषी विभागाकडून १९ निविष्ठा केंद्रांवर सिंधुदुर्गात कारवाई

Onion Procurement: केंद्राकडून राज्यात १२ रुपये ३५ पैशानं कांद्याची खरेदी सुरु, मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती

SCROLL FOR NEXT