Cold Weather Agrowon
ताज्या बातम्या

Cold Weather : राज्यात गारठा कमी होण्याची शक्यता

राज्याच्या किमान तापमानात वाढ झाली असली तरी उत्तर महाराष्ट्रात मात्र थंडी कायम आहे. आज (ता. २२) किमान तापमानातील वाढ कायम राहणार असून, गारठा कमी होण्याची शक्यता आहे.

Team Agrowon

पुणे : राज्याच्या किमान तापमानात (Minimum Temperature) वाढ झाली असली तरी उत्तर महाराष्ट्रात मात्र थंडी (Cold) कायम आहे. आज (ता. २२) किमान तापमानातील वाढ कायम राहणार असून, गारठा (Cold Weather) कमी होण्याची शक्यता आहे. कमाल तापमानात वाढ झाल्याने दुपारच्या वेळी उन्हाचा चटका (Heat) जाणवत आहे.

उत्तर महाराष्ट्रातील निफाड येथील गहू संशोधन केंद्र येथे शनिवारी (ता. २१) राज्यातील निचांकी ९.५ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले.

राज्याच्या उर्वरित भागात बहुतांशी ठिकाणी तापमान १४ अंशांच्या वर गेल्याने थंडी कमी झाली आहे. स्वच्छ सुर्य प्रकाशामुळे उन्हाचा चटका वाढला असून, राज्याच्या कमाल तापमानातही वाढ होत आहे.

बहुतांश ठिकाणी कमाल तापमानाचा पारा ३१ ते ३३ अंशांच्या आसपास आहे. सोलापूर आणि धुळे येथे राज्यातील उच्चांकी ३३ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले.

हिमालय पर्वत व लगतच्या भागात होत असलेली हिमवृष्टी सुरूच असली तरी उत्तर भारतातील राज्यात थंडी कमी झाली आहे.

शनिवारी (ता. २१) हरियाणाच्या हिस्सार येथे देशाच्या सपाट भूभागावरील यंदाच्या नीचांकी ३.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

आज (ता. २२) हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब हरियाणा, चंडीगडमध्ये विजांसह गारपीट होण्याची, तर दिल्ली, उत्तर प्रदेशात विजांसह पावसाची शक्यता आहे.

शनिवारी (ता. २१) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३१.९ (११.६), जळगाव ३१.६ (१२.०), धुळे ३३.० (१०.०), कोल्हापूर ३०.१ (१६.९), महाबळेश्वर २६.१(१३.७), नाशिक ३१.१ (११.६), निफाड ३०.५ (९.५), सांगली - (१४.३), सातारा ३१.० (१३.४), सोलापूर ३३.० (१७.१),

सांताक्रूझ २९.७ (१७.६), डहाणू २८.९ (१७.०), रत्नागिरी ३१.७(१७.५), औरंगाबाद २९.५ (१०.७), नांदेड ३०.४ (१६.६), परभणी ३१.९(१५.१), अकोला ३२.० (१६.४), अमरावती ३२.४ (१५.५), बुलढाणा ३०.६ (१५.५), ब्रह्मपूरी ३२.० (१६.८),

चंद्रपूर ३०.६ (१७.४), गडचिरोली ३१.४(१५.०), गोंदिया ३०.२(१५.५), नागपूर ३०.१ (१६.१), वर्धा ३१.०(१६.५), वाशीम ३२.४ (१५.८), यवतमाळ ३१.० (१९.०).

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mumbai APMC: मुंबई बाजार समितीच्या कारभाराची होणार चौकशी

Israel Lebanon Conflict: लेबनॉनमध्ये युद्धविराम नाही

White Grub Pest Management: हुमणी किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्गदर्शन मोहीम

Central Government Policy: कांदा, साखर उद्योगांबाबत बुधवारपर्यंत केंद्र निर्णय घेईल : आमदार दिलीप वळसे पाटील

Soybean Oil Demand: अमेरिकेत जैवइंधनासाठी सोयातेलाचा वापर वाढता

SCROLL FOR NEXT