Weather Update Agrowon
ताज्या बातम्या

Weather Update : उत्तर महाराष्ट्रात गारठा वाढण्याची शक्यता

राज्याच्या किमान तापमानात घट झाल्याने परभणीतील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात राज्यातील नीचांकी १०.२ अंश तापमानाची नोंद झाली. औरंगाबाद येथे ११ अंश, धुळे, निफाड, नांदेड, गोंदिया येथे पारा १२ अंश किंवा त्यापेक्षा खाली आहे.

टीम ॲग्रोवन

पुणे : राज्यात सध्या निरभ्र आकाश असल्याने स्वच्छ सूर्यप्रकाश जमिनीवर येत आहे. परिणामी, उन्हाचा चटका (Heat) जाणवत आहे. यातच राज्याच्या किमान तापमानात (Minimum Temperature) घट होत असल्याने अनेक ठिकाणी किमान तापमान पुन्हा १५ अंशांच्या खाली आले आहे. आज (ता.२४) उत्तर महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भाच्या उत्तर भागात किमान तापमानात घट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

राज्याच्या किमान तापमानात घट झाल्याने परभणीतील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात राज्यातील नीचांकी १०.२ अंश तापमानाची नोंद झाली. औरंगाबाद येथे ११ अंश, धुळे, निफाड, नांदेड, गोंदिया येथे पारा १२ अंश किंवा त्यापेक्षा खाली आहे.

उर्वरित राज्यात किमान तापमानाचा पारा १२ ते २० अंशांच्या दरम्यान होता. रत्नागिरीत राज्यातील उच्चांकी ३४.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उर्वरित राज्यातही बहुतांश ठिकाणी कमाल तापमान ३० अंशांच्या पार आहे. कमाल आणि किमान तापमानातही ९ ते २० अंशांपर्यंतची तफावत दिसून येत आहे. परिणामी, पहाटे गारठा तर दुपारी चटका अशी स्थिती कायम आहे.

राजस्थानातील चुरू येथे शुक्रवारी (ता.२३) देशाच्या सपाट भू-भागावरील नीचांकी ४.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पंजाब, हरियाना, चंडीगड, दिल्ली आणि गुजरात या राज्यांमध्येही थंडीच्या लाटेचा इशारा आहे.

उत्तरेकडील राज्यात थंड दिवस अनुभवायला मिळणार आहे. तर हरियाना, चंडीगड, पंजाब, हिमाचल प्रदेश, उत्तर राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार तसेच पश्‍चिम बंगालचा हिमालयाकडील भागात दाट धुक्याची स्थिती कायम राहील. आजपासून राज्याच्या उत्तरेकडील भागात किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे.

श्रीलंकेजवळ तीव्र कमी दाब क्षेत्र

नैर्ऋत्य बंगालच्या उपसागरातील तीव्र कमी दाब क्षेत्र (डिप्रेशन) श्रीलंकेच्या किनाऱ्याजवळ आले आहे. ही प्रणाली तमिळनाडूनच्या नागापट्टीनमपासून ४८० किलोमीटर पूर्वेकडे, तर चेन्नईपासून ५४० किलोमीटर आग्नेयेकडे समुद्रात होती. हे तीव्र कमी दाब क्षेत्र (डिप्रेशन) भारत आणि श्रीलंकेच्या दरम्यान असलेल्या कोमोरिन भागाकडे सरकण्याची शक्यता आहे

शुक्रवारी (ता. २३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३२.६ (१२.५), जळगाव ३१.५ (१३.२), धुळे ३१.१ (११.६), कोल्हापूर ३२.१ (१७.१), महाबळेश्‍वर २८ (१५.३), नाशिक ३१.६ (१३), निफाड ३१.६ (११.५), सांगली ३२.७ (१५.४), सातारा ३२.४ (१३.५), सोलापूर ३४.२ (१६.३), सांताक्रूझ ३२.३(१९.६), डहाणू २८ (१९.१), रत्नागिरी ३४.९ (१८.६), औरंगाबाद ३१.२ (११), नांदेड - (११.८), परभणी ३१.८ (१३.६), अकोला ३४ (१६.९), अमरावती ३३.६ (१४.३), बुलडाणा ३१.२ (१६.६), ब्रह्मपुरी ३३.९ (१४.१), चंद्रपूर २९.२ (१४.६), गडचिरोली २९.६ (१२.६), गोंदिया २९ (१२), नागपूर ३०.५ (१३.२), वर्धा ३१.१ (१३.८), यवतमाळ ३१.२ (१५.५).

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

CCI Cotton Procurement: आजपासून सीसीआयची कापूस खरेदी सुरू

Farmers' Mental Health: मानसिक तणाव, नैराश्यात असणाऱ्यांची संख्या चिंताजनक; शिवार हेल्पलाइनच्या अहवालातून चिंता व्यक्त

Swabhimani Shetkari Sanghatana Protest Suspended: ३१ तासांनंतर स्वाभिमानीचे ‘रास्ता रोको’ स्थगित; पुणे-बंगळूर महामार्ग मोकळा

Soybean Price: चंदनखेडा उपबाजारात सोयाबीनला ६४०० रुपये दर

E-Peek Pahani Problems: ई-पीक पाहणीतील अडथळ्यांनी शेतकरी त्रस्त; स्मार्टफोन, सर्व्हर, लोकेशन टॅगिंगच्या अडचणी

SCROLL FOR NEXT