Weather Update Agrowon
ताज्या बातम्या

Weather Update : मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात गारपिटीची शक्यता

पावसाळी वातावरण आणि ढगाळ हवामानामुळे उन्हाचा चटका काहीसा कमी झाला आहे. बुहतांश ठिकाणी कमाल तापमानाचा पारा ३३ ते ३६ अंशांच्या दरम्यान आहे.

Team Agrowon

Weather पुणे : मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या काही भागात वादळी पावसाने (Heavy Rain) हजेरी लावली आहे. आज (ता. ७) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात विजांसह वादळी पावसाची शक्यता (Rain Forecast) आहे.

तसेच मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी गारपीट (Hailstorm) होण्याचा इशाराही हवामान विभागाने (Weather Department) दिला आहे.

पावसाळी वातावरण आणि ढगाळ हवामानामुळे उन्हाचा चटका काहीसा कमी झाला आहे. बुहतांश ठिकाणी कमाल तापमानाचा पारा ३३ ते ३६ अंशांच्या दरम्यान आहे. उन्हाच्या झळा जाणवत असून, घामाच्या धारा वाहू लागल्या आहेत.

सोमवारी (ता. ६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सांताक्रुज येथे राज्यातील उच्चांकी ३८.१ अंश तापमानाची नोंद झाली. सांताक्रुझ येथील यंदाच्या हंगामातील हा उच्चांक आहे. ब्रह्मपूरी आणि सोलापूर येथे ३७ अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंदले गेले.

राज्याच्या किमान तापमानात चांगलीच वाढ झाल्याने थंडी पुर्णपणे ओसरली आहे. यातच दरम्यान दक्षिण कोकणापासून मध्य छत्तीसगडपर्यंत समुद्र सपाटीपासून ९०० मीटर उंचीपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय असून, नैर्ऋत्य राजस्थान परिसरावर चक्राकार वारे वाहत असल्याने राज्यात वादळी पावसाला पोषक हवामान आहे.

रविवारी पुणे, नगर, नाशिक, औरंगाबाद जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार वारे, विजांसह पावसाने हजेरी लावली.

आज (ता. ७) विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहून विजा आणि मेघगर्जना, विजा, वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे.

नगर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासह, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची इशारा आहे. राज्यात उन्हाचा चटका देखील कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

सोमवारी (ता. ६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३५.२ (१५.८), जळगाव ३४.० (१८.७), धुळे ३३.० (१६.०), कोल्हापूर ३४.६ (२०.१), महाबळेश्वर ३०.१ (१८.४), नाशिक ३२.७ (१७.६), निफाड ३५.०(१५.२), सांगली ३५.२ (१५.८), सातारा ३५.१ (१७.७),

सोलापूर ३७.० (२२.२), सांताक्रूझ ३८.१ (२५.४), डहाणू ३२.९ (२४.५), रत्नागिरी ३६.० (२१.८), छत्रपती संभाजीनगर ३४.६ (१६.७), नांदेड ३६.० (२०.२), परभणी ३५.०(२०.०), अकोला ३५.० (२१.१),

अमरावती ३५.२(१९.३), बुलढाणा ३३.०(१८.८), ब्रह्मपूरी ३७.२ (२०.२), चंद्रपूर ३६.२ (१९.२), गडचिरोली ३४.०(१६.२), गोंदिया ३५.४ (१७.०), नागपूर ३५.४ (१९.०), वर्धा ३५.८(१८.८), यवतमाळ ३५.५ (१९.०).

वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

मध्य महाराष्ट्र : नाशिक, नगर, पुणे.

मराठवाडा : छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली.

विदर्भ : बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tractor Heating in Summer: उन्हाळ्यात ट्रॅक्टर गरम होतोय? देखभालीच्या सोप्या ७ टिप्स!

Power Supply Issues: धान पिकाला विजेचा फटका

Weekly Market Issue: धाड आठवडी बाजार प्रश्नावर आंदोलनानंतर प्रशासनाचे आश्वासन

Flood Fishermen Compensation: पूरग्रस्त मत्स्य व्यावसायिकांना चार कोटींची भरपाई मंजूर

CPIM Protest: बीड जिल्ह्यात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची निदर्शने

SCROLL FOR NEXT