Cold Weather Agrowon
ताज्या बातम्या

Cold Weather : राज्यात गारठा वाढण्याची शक्यता

राज्यात आकाश निरभ्र होत असून, अनेक भागात जोरदार वारे वाहत आहे. यामुळे किमान तापमानात घट झाली आहे.

Team Agrowon

पुणे : ढगाळ आकाश, (Cloudy Weather) धुक्यामुळे राज्याच्या किमान तापमानात (Minimum Temperature) वाढ झाली होती. मात्र ही परिस्थिती निवळताच तापमानात पुन्हा घट होऊ लागली आहे. आज (ता. ३) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात गारठा वाढण्याची (Cold Weather) शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

राज्यात आकाश निरभ्र होत असून, अनेक भागात जोरदार वारे वाहत आहे. यामुळे किमान तापमानात घट झाली आहे. गुरुवारी (ता. २) धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्यातील निचांकी १० अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले.

राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान १० ते १८ अंशांच्या दरम्यान आहे. कमाल तापमानातही चढ-उतार होत असून, दुपारच्या वेळी उकाडा कायम आहे. रत्नागिरी येथे राज्यातील उच्चांकी ३५.४ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले.

नैर्ऋत्य बंगालच्या उपसागरात तीव्र कमी दाब क्षेत्र (डिप्रेशन) गुरूवारी (ता. २) दक्षिण श्रीलंकेत होते. ही प्रणाली नैर्ऋत्य दिशेकडे जात असून, आज कोमोरीन भागाकडे सरकणार आहे.

तामिळनाडू, केरळ, लक्षद्वीप बेटांवर विजांसह पावसाची शक्यता आहे. उत्तर भारतातील राज्यात थंडी कमी-अधिक होत आहे.

गुरूवारी (ता. २) राजस्थानच्या चुरू येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आज (ता. ३) ओडिशा, मध्य प्रदेशात थंडीची लाट येण्याची शक्यता आहे.

गुरूवारी (ता. २) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे २८.५ (१३.९), जळगाव २८.५ (१२.४), धुळे २६.०(१०.०), कोल्हापूर ३०.२ (१९.२), महाबळेश्वर २४.१ (१३.८), नाशिक २६.९ (१२.६),

निफाड २७.१ (१२.४), सांगली ३०.८ (१८.३), सातारा २९.१ (१७.२), सोलापूर ३१.८ (१७.४), सांताक्रूझ ३४.० (२४.८), डहाणू २८.० (१८.०), रत्नागिरी ३५.४(२२.०), औरंगाबाद २७.८ (११.२), नांदेड - (१७.०), परभणी २९.४(१४.०),

अकोला ३०.८ (१३.६), अमरावती ३०.२ (१३.३), बुलढाणा २७.० (१५.०), ब्रह्मपूरी ३१.२ (१२.५), चंद्रपूर २९.६ (१४.८), गडचिरोली ३१.६(१५.२), गोंदिया २९.५ २(१०.५), नागपूर २९.४ (१२.७), वर्धा ३०.०(१३.५), वाशीम ३०.८ (१४.८), यवतमाळ ३१.२ (१५.०).

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Banana Crop Insurance : केळी विमाधारकांच्या परताव्याची मागणी

Drought Relief : दुष्काळसदृश स्थितीत पाणी, चारा, रोजगार हमीच्या उपाययोजनांना गती द्या; जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

Beed Crop Damage : बीड जिल्ह्यात २.२३ लाख हेक्टरवरील पीक नुकसानीचे पंचनामे पूर्ण

PM Modi Baramati Visit: पंतप्रधान मोदी ३ नोव्हेंबरला बारामती दौऱ्यावर शरद पवार यांची माहिती

Crop Damage Survey: परभणी जिल्ह्यात पीक नुकसान पंचनामे वेगाने

SCROLL FOR NEXT