Pomegranate Agrowon
ताज्या बातम्या

डाळिंबाचा मृग बहार बहरू लागला

बागा फुलोरावस्थेत; तेलकट रोगाचा काहीसा प्रादुर्भाव

अभिजित डाके : ॲग्रोवन वृत्तसेवा

सांगली ः यंदाच्या डाळिंबाच्या मृग बहारातील (Pomegranate Mrug Blossom) बागा फुलोरावस्थेत आहेत. पोषक वातावरण असल्याने कळीचे प्रमाण देखील चांगले आहे. कळी सेटिंग होण्यास वातावरण अनुकूल आहे. त्यामुळे डाळिंब उत्पादकांच्या (Pomegranate Producer) चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण निर्माण झाले असले तरी, काही अंशी तेलकट रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी चिंतातूर आहेत.

देशात मे च्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत मृग बहार १० ते १५ टक्के इतका धरला आहे. या क्षेत्रातील डाळिंब फुलोरावस्थेत आहे. अनेक ठिकाणी लहान फळे देखील लागली आहेत. सध्या या बहराला पोषक असे वातावरण आहे. त्यामुळे कळीचे सेटिंग चांगले होत आहे. त्याचप्रमाणे कळींची संख्या ही अपेक्षित आली आहे. मात्र, काही ठिकाणी पावसामुळे तेलकट रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.

देशातील डाळिंब उत्पादन घेणाऱ्या राज्यात मृग बहार घेण्यासाठी शेतकरी तयारी करू लागला आहे. गेल्या काही दिवसांपासून डाळिंब उत्पादन घेणाऱ्या परिसरात पावसाने हजेरी लावली. त्यामुळे डाळिंब उत्पादक डाळिंबाचा मृग बहार धरण्यासाठी पुढे आला आहे. या महिना अखेरपर्यंत डाळिंबाचा मृग बहार धरण्याचे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. मात्र, गेल्यावर्षी अतिवृष्टी आणि मॉन्सूनोत्तर पावसामुळे डाळिंबाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे यंदाही अशाच परिस्थितीमुळे मृग बहार घेण्याऐवजी दुसरा बहार घेण्यास शेतकरी पसंती देत असल्याचे दिसते आहे. त्यामुळे देशातील मृग बहाराच्या क्षेत्रात ४० टक्के इतकी घट होईल, अशी शक्यता डाळिंब संघाने व्यक्त केली.

५० टक्के आगाप मृग बहार
सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यात प्रामुख्याने मृग बहार घेतला जातो. मात्र, अलीकडच्या काळात तालुक्यांत आगाप मृग बहार धरण्यासाठी शेतकरी पुढे येत असल्याचे चित्र आहे. यंदा शेतकऱ्यांनी मे महिन्याचा दुसऱ्या आठवड्यात ५० टक्क्यांवर मृग बहार धरला आहे. बागा फुलोरावस्थेत आहेत. पोषक वातावरण असल्याने डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण आहे.प्रभाकर चांदणे, अध्यक्ष, अखिल भारतीय डाळिंब संघ.

डाळिंबाचा आगाप मृग बहार धरला आहे. बागा फुलोरावस्थेत आहेत. मात्र, वातावरणात बदल होत असल्याने तेलकट रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. यंदा देशातील डाळिंबाच्या मृग बहारातील क्षेत्रात लक्षणीय घट होण्याची शक्यता आहे.
प्रभाकर चांदणे, अध्यक्ष, अखिल भारतीय डाळिंब संघ.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orange Fruit Drop: शुक्लकाष्ठ फळगळीचे!

Pimpalapur Farmer Death Assistance: पिंपळापूर येथील आत्महत्याग्रस्त कुटुंबाची प्रशासनाकडून भेट; शासकीय योजनांचा लाभ देण्याची कार्यवाही

New Gram Panchayat Schemes: ग्रामपंचायतींसाठी पाच नव्या योजनांना मंजुरी

Cibil Score Issue: कर्जमुक्ती योजनेमुळे सिबिल स्कोअरवर परिणाम : तुपकर

Farmer Protest Warning: ‘डीबीटी’साठी शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

SCROLL FOR NEXT