Crop Loan Agrowon
ताज्या बातम्या

Crop Loan : पीककर्ज वाटपात बँकांचे आडमुठे धोरण

Agriculture Loan : जिल्ह्यात आतापर्यंत राष्ट्रीय, खासगी व ग्रामीण बँकेसह जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने ५७ टक्के पीककर्ज वाटप केले आहे.

Team Agrowon

Amravati News : जिल्ह्यात आतापर्यंत राष्ट्रीय, खासगी व ग्रामीण बँकेसह जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने ५७ टक्के पीककर्ज वाटप केले आहे. यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेचा वाटा सर्वाधिक असून त्यांची सरासरी ८९ टक्क्यांपर्यंत गेली आहे.

खरीप हंगामात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने ५६५ कोटी रुपये पीककर्ज वाटपाचे लक्ष्यांक निश्‍चित केले आहे. १ एप्रिल ते ३१ मे या कालावधीत या बँकेने चौदा तालुक्यांतील ४६,९४१ सभासदांना ५०१ कोटी ५६ लाख रुपये पीककर्ज वाटप केले आहे.

जिल्ह्यातील तब्बल ७९,४६६ हेक्टर क्षेत्रासाठी कर्ज देण्यात आले आहे. यामध्ये सहा सभासद कर्जमाफीतील सभासद असून त्यांना २.७२ लाख रुपयांचे नवे कर्ज देण्यात आले असून ४६,९३५ सभासद बँकेचे नियमित सभासद आहेत. खरीप हंगामात १४५० कोटी रुपयांचे लक्ष्यांक निश्‍चित करण्यात आले आहे.

त्यातुलनेत आतापर्यंत ८२२ कोटी ४६ लाख कर्जवाटप करण्यात आले असून, यामध्ये राष्ट्रीय बँकांनी २९४.५० कोटी, (३७ टक्के), खासगी बँकांनी १२.१९ कोटी (१७ टक्के), ग्रामीण बॅंकेने १४.२० कोटी (८१ टक्के) व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने ५०१.५६ कोटी (८९ टक्के) कर्ज दिले आहे.

पीककर्ज वाटपात हात आखडता

पीककर्ज वाटपात राष्ट्रीय व खासगी बँकांनी हात आखडता ठेवल्याचे दिसून येत आहे. राष्ट्रीय बँकांचे १ लाख ३ हजार ५० सभासद असून त्यापैकी २३,९६५ शेतकऱ्यांना कर्ज देण्यात आले आहे. कर्ज मिळणाऱ्या सभासदांची सरासरी २३, अशी आहे.

तर खासगी क्षेत्रातील बँकांनी ७३७५ सभासदांपैकी ८९७ सभासदांना कर्ज दिले, तर ग्रामीण बँकेने त्यांच्या २४०० सभासदांपैकी १०८१ सभासदांना (४५ टक्के) कर्ज दिले आहे. या बँकेने ६५ टक्के सभासदांना कर्जप्रक्रियेत सामावून घेतले आहे. ७२ हजार सभासदांपैकी ४६,९४१ सभासदांना या हंगामात पीककर्ज दिले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Water Conservation: जल-सृष्टी व्यवस्थेचे जनकेंद्री पुनरुज्जीवन

Grain Storage Pest Management: धान्य साठवणुकीतील ‘लेसर ग्रेन बोरर’

Rural Education Programme: जैवविविधता, शिक्षणाशी जोडणारी मायेसा फाउंडेशन

Women Farmer Success: सेंद्रिय शेती सोबतच उभारले महिलांचे संघटन

Weekly Weather: पूर्व विदर्भात पाऊस; उर्वरित जिल्ह्यांत उघडीप शक्य

SCROLL FOR NEXT