Mumbai Police Agrowon
ताज्या बातम्या

Women Police : पोलीस महिलांना देणार ‘पुन:धैर्य’

घरगुती प्रकरणात किंवा अन्य काही बाबतीत महिलांकडून पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात येते. काही प्रकरणांमध्ये पोलिसांच्या भरोसा सेलच्या माध्यमातून दोन्ही बाजूच्या व्यक्तींना एकत्र बसवून यशस्वी तोडगादेखील काढला जातो.

Team Agrowon

प्रकाश लिमये, भाईंदर

पोलिसांकडे तक्रार दाखल होण्याआधी किंवा तक्रार दाखल झाल्यानंतर तडजोड करून प्रकरण शांततेने सोडविण्याचा सल्ला दिला जातो; पण तडजोड झाल्यानंतरही पुन्हा त्रास देण्याचे प्रकार घडतात.

हे प्रकार टाळण्यास महिलांना धैर्य एकवटण्यासाठी प्रोत्साहन मिळावे, यासाठी मिरा-भाईंदर वसई-विरार पोलिस आयुक्त मधुकर पांडे (Police Commissioner Madhukar Pandey) यांच्या सूचनेनुसार पोलिसांकडून महिलांसाठी (Police Women) पुन:धैर्य योजना सुरू करण्यात आली आहे.

घरगुती प्रकरणात किंवा अन्य काही बाबतीत महिलांकडून पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात येते. काही प्रकरणांमध्ये पोलिसांच्या भरोसा सेलच्या माध्यमातून दोन्ही बाजूच्या व्यक्तींना एकत्र बसवून यशस्वी तोडगादेखील काढला जातो.

मात्र काही काळानंतर तोडगा निघालेल्या प्रकरणात महिलांना पुन्हा त्रास द्यायला सुरुवात झाल्याचे दिसून येत असते. संपूर्ण देशाला हादरवून सोडलेल्या श्रद्धा वालकर हत्या प्रकरणातही त्याचा प्रत्यय आला आहे.

याप्रकरणात श्रद्धाने सुरुवातीच्या काळात दाखल केलेल्या तक्रारीवर यशस्वी तोडगा काढण्यात आला होता. मात्र त्याचा शेवट अत्यंत भयावह असा झाला. या घटनेवरून पोलिसही आता सतर्क झाले आहेत.

तक्रारींचा पुन्हा आढावा

तोडगा निघालेल्या प्रकरणात महिलांना पुन्हा होणारा त्रास टाळण्यासाठी आयुक्त मधुकर पांडे यांच्या सूचनेनुसार पुन:धैर्य योजना सर्व पोलिस ठाण्यांमध्ये राबविण्यात येणार आहे.

संबंधित पोलिस ठाण्यामध्ये वर्षभरात महिलांकडून दाखल झालेल्या सर्वच तक्रारींचा आढावा घेतला जाणार आहे.

पोलिस ठाण्यातील महिला पोलिस दर शनिवारी संबंधित महिलांशी संपर्क साधणार आहेत, त्यांच्याशी चर्चा करून त्यांच्या पुन्हा काही त्रास होत आहे का, याची चौकशी करणार आहेत.

एखाद्या प्रकरणात तसेच आढळले, तर लगेचच कारवाई केली जाणार आहे. यावर वरिष्ठ अधिकाऱ्‍यांकडून नजर ठेवली जाणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Massive Agricultural Crisis : बळीराजा उद्ध्वस्त! ८ लाख हेक्टरवरील पिके मातीमोल

Satara Rabi Season : सातारा जिल्ह्यात 'रब्बी'ची केवळ ५ टक्केच पेरणी पूर्ण; पाऊस गायब झाल्याने बळीराजा संकटात!

Nar-Par Girna Project : नार-पार, गिरणा नदीजोड प्रकल्पाला तीव्र विरोध; जमिनी आणि पाणी वाचवण्यासाठी शेतकरी एकवटले!

Agriculture Electricity : शेतीपंपांच्या विजेसाठी चामोर्शीत बळीराजा आक्रमक; संतप्त शेतकऱ्यांनी मुख्य रस्त्यावर केला चक्काजाम!

Hingoli Agriculture Crisis : हिंगोली जिल्ह्यात शेती वाचवा अभियान सुरू

SCROLL FOR NEXT