Chana Pod Borer | Chana Pod Agrowon
ताज्या बातम्या

Chana Pod Borer : ढगाळ वातावरणामुळे हरभऱ्यावर घाटे अळी

परभणी, हिंगोली जिल्ह्यांत ढगाळ वातावरणामुळे हरभऱ्यावर घाटे अळीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. फुलोरा अवस्थेतील पिकाचे नुकसान होत आहे.

टीम ॲग्रोवन

Parbhani: परभणी, हिंगोली जिल्ह्यांत ढगाळ वातावरणामुळे (Cloudy Weather) हरभऱ्यावर घाटे अळीचा (Pod Borer) प्रादुर्भाव आढळून येत आहे. फुलोरा अवस्थेतील पिकाचे नुकसान (Crop Damage) होत आहे. सध्या आढळणारी कीड ही अंडी अवस्था तसेच प्रथम अवस्थेतील असल्यामुळे वेळीच उपाययोजना केल्यास कमी खर्चात किडींचे प्रभावी नियंत्रण होऊ शकते.

शेतकऱ्यांनी वेळेवर उपाययोजना कराव्यात, असा सल्ला कृषी शास्त्रज्ञांनी दिला आहे. परभणी, हिगोंली जिल्ह्यात यंदा हरभऱ्याची पेरणी २ लाख ६७ हजार हेक्टरवर झाली आहे. यंदा बहुतांश भागात हरभरा पेरणीस उशीर झाला आहे. हरभऱ्याचे पीक कळ्या तसेच फुले लागण्याच्या अवस्थेत आहे. मागील दोन दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे हरभऱ्यावरील घाटेअळीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे.

घाटेअळीचे पतंग मोठ्या प्रमाणावर अंडी देऊ शकतात. पोषक वातावरणामुळे सध्या अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. ही कीड बहुभक्षी आहे. विशेषतः पीक फुलोरा आणि प्रामुख्याने घाटे अवस्थेत असताना नुकसानकारक ठरू शकते.

....अशा करा उपाययोजना...

कोळपणी करून पीक तणविरहित ठेवावे. मोठ्या अळ्या हाताने वेचून त्यांना नष्ट करावे. या अळीच्या सर्वेक्षणासाठी प्रति हेक्टरी ५ कामगंध सापळे जमिनीपासून १ मीटर उंचीवर लावावेत. कामगंध सापळ्यांमध्ये ८ ते १० पतंग प्रति सापळा सतत २ ते ३ दिवस आढळल्यास शिफारशित कीटकनाशकांची फवारणी करावी. पिकाच्या किमान एक ते दोन फूट उंचीवर पक्षी थांबे हेक्टरी ५० ते ६० ठिकाणी उभारावेत.

पिकाच्या सुरुवातीच्या काळात ५ टक्के निंबोळी अर्काची किंवा अझाडिरॅक्टिन (५०० पीपीम) ५ मिली प्रति लिटर पाण्यातून प्रतिबंधात्मक फवारणी करावी. किडींचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीच्या वर आढळून आल्यास शास्त्रज्ञांच्या सल्ल्यानुसार शिफारशीत कीटकनाशकांची फवारणी करावी. कीटकनाशकांचे द्रावण तयार करतेवेळी तसेच फवारणीवेळी चष्मा, हातमोजे, तोंडावर मास्कचा वापर करावा, असे आवाहन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कीटकशास्त्र

विभागातील शास्त्रज्ञ डॉ. पी. एस. नेहरकर, डॉ. अनंत लाड, डॉ. राजरतन खंदारे, डॉ. योगेश मात्रे यांनी केले.

२१ एकरांवरील हरभरा कळ्या फुलोरा अवस्थेत आहेत. घाटे अळीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. मर रोगामुळे नुकसान झाले त्यानंतर आता घाटे अळीमुळे त्यात भर पडली आहे.

- मंगेश देशमुख, पेडगाव, जि. परभणी.

दहा एकरांतील हरभऱ्यावर घाटेअळी दिसत आहे. ढगाळ वातावरणामुळे नुकसानीत वाढ होऊ शकते.

- काशिनाथ सांगळे, केळी, जि. हिंगोली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cabbage Farming: कोबी पिकात आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब

Brazil Agricultural Cooperation: ब्राझीलसोबत कृषी क्षेत्रामध्ये सहकार्य संधी

Onion MSP Demand: कांद्याला तातडीने प्रतिक्विंटल २ हजार हमीभाव, १,५०० रुपये अनुदान देण्याची मागणी

Akola Heatwave: अकोला जिल्ह्यात अति उष्णतेमुळे होरपळ

Mini kit Seeds Application: मिनीकिट बियाण्यांसाठी अर्जाचा आज शेवटचा दिवस

SCROLL FOR NEXT