Chana Pod Borer  Agrowon
ताज्या बातम्या

Chana Pest : हरभरा पिकावर घाटे अळीचा प्रादुर्भाव

वावडे व (ता. अमळनेर) व परिसरात गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे रब्बी हंगामातील हरभरा पिकावर पाने खाणाऱ्या हिरव्या घाटे अळीचा प्रादुर्भाव झाला आहे.

टीम ॲग्रोवन

वावडे, जि. जळगाव ः वावडे व (ता. अमळनेर) व परिसरात गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे (Cloudy Weather) रब्बी हंगामातील हरभरा पिकावर (Chana Crop) पाने खाणाऱ्या हिरव्या घाटे अळीचा प्रादुर्भाव (Pod Borer On Chana) झाला आहे. अनेक कीटकनाशकांची फवारे करूनही ओळीचा प्रादुर्भाव कमी होत नसल्याने शेतकरी पुन्हा संकटात सापडले आहेत.

वावडेसह परिसरात या वर्षी उशिरा पाऊस सुरू झाल्याने पेरणी लावलीनंतर जास्त प्रमाणात पाऊस झाल्याने पिकांच्या वाढीवर परिणाम झाला. त्यातून सावरलेल्या शेतकऱ्यावर अवकाळी पावसाचे संकट उभे राहिले.

आता ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांच्या खरीप पिकांसह रब्बी पिकांचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दुसरीकडे अतिवृष्टीच्या तडाख्यातून वाचलेल्या पिकांवर रोगराईचा परिणाम झाला आहे. त्यामुळे उत्पादनात मोठी घट झाली आहे. अशातच बँकांकडून शेतकऱ्यांनी कर्ज काढले आहे.

आता हे कर्ज फेडायचे कसे, हा प्रश्‍न शेतकऱ्यांसमोर उभा आहे. हरभरा पिकावर अळीचा प्रादुर्भाव वाढत असल्याने हरभरा पीक धोक्यात आले असून, यंदा शेतकऱ्यांचा खरीप हंगाम वाया गेला आहे. उरली सुरली पिके परतीच्या पावसाने वाया गेली. अशा स्थितीत शेतकरी रब्बी हंगामावर अवलंबून असून, वातावरणातील बदलांचा फटका रब्बी हंगामातील पिकांवर मोठ्या प्रमाणात घाटे अळीचा प्रादुर्भाव वाढला असला तरी कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून मार्गदर्शन केले जावे, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT