PM Modi Pune Agrowon
ताज्या बातम्या

PM Modi Pune Visit : नरेंद्र मोदी-शरद पवार एकाच मंचावर, पंतप्रधानांना लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान

PM Modi Pune Visit Live Updates : लोकमान्य टिळक यांची आज 103 वी पुण्यतिथीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक पुरस्कार सन्मान करण्यात आला.

Team Agrowon

PM Modi in Pune : लोकमान्य टिळक यांची आज 103 वी पुण्यतिथी आहे. त्यानिमित्त प्रतिष्ठित, समाजासाठी अतुलनीय कार्य करणाऱ्या लोकांचा लोकमान्य टिळक पुरस्कार सन्मान करण्यात येतो. यंदाचा लोकमान्य टिळक पुरस्कार पंतप्रधान मोदींना प्रदान करण्यात आला. पुण्यातील एसपी महाविद्यालयाच्या मैदानावर हा कार्यक्रम पार पडला. टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष दीपक टिळक यांच्या हस्ते मोदी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमानिमित्ताने राष्ट्रवादीच्या फुटीनंतर मोदी-पवार एकाच मंचावर आले.

यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, माजी मुख्यमेंत्री सुशीलकुमार शिंदे, रोहित टिकळ मंचावर उपस्थित होते.

टिळक पुरस्कार सोहळ्यानिमित्त पंतप्रधान मोदी पुण्यात दाखल झाले. पंतप्रधान मोदी एअर फोर्सच्या विशेष विमानाने पुण्यात दाखल झाले. त्यांचे राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी स्वागत केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे शहरात दाखल झाल्यानंतर दगडूशेठ गणपती मंदिरात दाखल झाले. या ठिकाणी त्यांनी पूजा अन् अभिषेक केले. त्यानंतर त्यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली.

पुरस्कार सोहळा कार्यक्रमस्थळी पंतप्रधान मोदी आणि शरद पवार एकाच मंचावर आले. मोदी-पवार भेटीचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे, त्या व्हिडिओत शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांच्या संवाद झाल्याचं दिसून येत आहे. तसेच, शरद पवारांनी मोदींचा हात हाती घेऊन, त्यांची पाठही थोपटल्याचे दिसून येत आहे. या व्हिडिओची सध्या राजकीय वर्तुळात आणि सोशल मीडियावर सर्वत्र चर्चा होत आहे. 

दरम्यान, मणिपूर हिंसाचार आणि संभाजी भिडे यांच्या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ काॅंग्रेसच्यावतीने आंदोलन केले. पुण्यातील मंडई परिसरात हे आंदोलन सुरु आहे. त्याठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT