Cotton Bollworm Agrowon
ताज्या बातम्या

Cotton Bollworm : अकोला जिल्ह्यात कपाशीवर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव

Cotton Pest Control : या हंगामात जूनच्या सुरुवातीला लागवड असलेल्या कपाशीच्या पिकावर ठिकठिकाणी यंदा गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव आढळून आलेला आहे.

Team Agrowon

Akola News : या हंगामात जूनच्या सुरुवातीला लागवड असलेल्या कपाशीच्या पिकावर ठिकठिकाणी यंदा गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव आढळून आलेला आहे. अळीचे प्रमाण वाढत आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व इतर अधिकाऱ्यांनी जिल्ह्यात वेगवेगळ्या तालुक्यात केलेल्या पाहणीतून हे तथ्य समोर आले आहे.

शेतकऱ्यांनी अळीला प्रतिबंध करण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, असे आवाहन याबाबत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे यांनी केले आहे. श्री. किरवे व त्यांच्या चमूने शुक्रवारी (ता.२५) बाळापूर तालुक्यात व्याळा, खिरपुरी येथे प्रक्षेत्र भेट दिली.

तसेच यापूर्वी अकोला, अकोट, तेल्हारा तालुक्यातील काही भागांत सुद्धा भेट देऊन कपाशीची पाहणी केली. तेव्हा पिकावर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव आढळून आला. विशेष करून ज्या शेतांमध्ये पेरणी जूनच्या पहिल्या आठवड्यात केली आहे,

त्या कपाशीवर सध्या फुले, पात्या व लहान बोंड आहे. त्या ठिकाणी गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव आढळून आला. कपाशीच्या शेतामध्ये जी फुले सुकलेल्या अवस्थेत किंवा डोमकळी सदृश अवस्थेत होती अशा प्रत्येक फुलात गुलाबी बोंडअळी आढळून आली.

फुलांमध्ये अळीची दुसऱ्या व तिसऱ्या अवस्थेतील अळी कोवळ्या बोंडामध्ये शिरताना आढळून आली. प्रादुर्भाव सद्यःस्थितीत १० ते २० टक्के आढळून आला. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी जूनच्या पहिल्या आठवड्यात पेरणी केली आहे त्यांनी देखील निरीक्षण करावे, असा प्रादूर्भाव इतर भागातही कपाशी पिकावर असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

(टीप- ‘ॲग्रोवन’च्या २८ ऑगस्ट रोजीच्या अंकात पान ११ वर गुलाबी बोंड अळीच्या नियंत्रणाविषयी सविस्तर मार्गदर्शनपर लेख देण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी त्यानुसार व्यवस्थापन करावे. संबंधित तज्ज्ञांशीही चर्चा करावी.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

MAGNET Project: शेतमालाचे मुल्यवर्धन, साठवणूक क्षमता वाढीसाठी साहाय्य; ९३ कोटी निधी मंजूर

Fake Seeds: बनावट बियाणे विक्रीला जरब

Farm Road Crisis: शेतरस्त्यासाठी शेतकरी पितापुत्राचा आत्मदहनाचा प्रयत्न

Water Conservation: जलस्रोतांसाठी व्यापक उपाययोजना करा

PM Kisan Scheme: ‘पीएम किसान’साठी ‘ॲग्रीस्टॅक’ बंधनकारक

SCROLL FOR NEXT