PDKV AKOLA  Agrowon
ताज्या बातम्या

PDKV Akola : कापूस, ज्वारी, सोयाबीनसाठी ‘पंदेकृवि’कडून शिफारशी जाहीर

Kharif Season : जिल्ह्यात पावसाचे आगमन उशीर झाल्याने खरीप हंगामातील पेरणीला उशीर झाला आहे.

Team Agrowon

Akola News : जिल्ह्यात पावसाचे आगमन उशीर झाल्याने खरीप हंगामातील पेरणीला उशीर झाला आहे. आपत्कालीन पीक नियोजनाबाबत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने शिफारशी केल्या आहेत. या शिफारशीनुसार शेतकऱ्यांनी खरीप हंगामात पिकांचे नियोजन करावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे यांनी केले आहे.

कापूस या अमेरिकन तसेच देशी कपाशीचे लवकर पक्व होणारे वाण वापरावेत. साधारण: २० टक्के जादा बियाणे वापरावे. सुधारित व संकरीत वाणाच्या बाबतीत दोन झाडांमधील अंतर कमी करावे. मूग, उडीद, सोयाबीन पिकांवर आंतरपीक म्हणून अंतर्भावकरावा.

कापूस, ज्वारी : तूर : ज्वारी या त्रिस्तरीय आंतरपीक पद्धतीचा (६:१:२:१) अवलंब करावा. ज्वारी पेरणीसाठी संकरित ज्वारीचा सीएसएच ९ किंवा सीएसएच १४ वाण वापरावा. बियाणाचा दर २० ते २५ टक्के वाढून पेरणी करावी.

सोयाबीन पेरणी करताना सोयाबीन टीएएमएस ३८, टीएएमएस ९८, ३१ किंवा जेएस ३३५ यापैकी उपलब्ध वाण वापरावा. सोयाबीनच्या दोन, सहा किंवा नऊ ओळीनंतर म्हणजेच तुरीची एक ओळ पेरावी. मूग, उडीद, तूर नेहमीप्रमाणे पेरणी करावी.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT