Gramsevak Agrowon
ताज्या बातम्या

Amravati Rural News : ग्रामसेवक सुनावणीला गैरहजर राहिल्याने वेतन कपातीची कारवाई

मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी संबंधित ग्रामसेवकांना जाब विचारण्यासाठी चार दिवसांपूर्वी पाचारण केले होते, मात्र २८ ग्रामसेवकांनी दांडी मारली.

Team Agrowon

Amravati News : १५ व्या वित्त आयोगाचा शासनाचा (Finance Commission) निधी खर्च न केल्यामुळे त्याचे उत्तर देण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी (CEO) उपस्थित राहण्याबाबत ग्रामसेवकांना नोटीस दिली होती, २८ ग्रामसेवक (Gramsevak) सुनावणीला अनुपस्थित राहिल्याने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी ग्रामसेवकांना नोटीस दिली असून वेतन कपातीचा इशारा दिला आहे.

१५ व्या वित्त आयोगांतर्गत राज्य व केंद्र शासनाकडून विकास निधी दिला जातो. त्यापैकी सर्वाधिक ८० टक्के निधी ग्रामपंचायतींना तर प्रत्येकी १० टक्के निधी पंचायत समिती व जिल्हा परिषदेला दिला जातो.

मात्र मागील काही काळापासून ग्रामपंचायतींचा निधीच खर्च न झाल्याची बाब समोर आली. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून त्याबाबत तपासणी केली असता केवळ पाच टक्के निधीच खर्च झाल्याचे समोर आले.

त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी संबंधित ग्रामसेवकांना जाब विचारण्यासाठी चार दिवसांपूर्वी पाचारण केले होते, मात्र २८ ग्रामसेवकांनी दांडी मारली. पर्यायाने सीईओंनी सर्वांना नोटीस जारी केली आहे.

मात्र प्रलंबित मागण्यांसाठी ग्रामसेवकांचे कामबंद आंदोलन सुरू असल्याने गैरहजर राहिल्याचे ग्रामसेवकांचे म्हणणे आहे.

तालुकानिहाय ग्रामसेवकांची संख्या

अमरावती ४, भातकुली ३, नांदगावखंडेश्वर १, धामणगावरेल्वे ५, मोर्शी २, वरूड २, अचलपूर २, अंजनगावसुर्जी १, धारणी ५, चिखलदरा ३.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

CJP Jantar Mantar Protest: विद्यार्थ्यांचे जंतर-मंतरवरील आंदोलन मागे, 'सीजेपी'च्या ३ मागण्या सरकारकडून मान्य

Ahilyadevi Holkar Karjmukti : साताऱ्यातील ५३ हजार ७३६ खात्यांची माहिती अपलोड

Agriculture Water Crisis: जलसंकटाच्या तीव्रतेत यंदा ३३ टक्क्यांनी वाढ

Farmer Loan Waiver List : दोन लाख शेतकऱ्यांची कर्जमाफीची यादी अपलोड

Kolhapur Sowing Update: कोल्हापूर जिल्ह्यात खरीप पेरणी ७१.३७ टक्क्यांवर

SCROLL FOR NEXT