wheat Agrowon
ताज्या बातम्या

वाढत्या तापमानातही तग धरणारे गव्हाचे नवे वाण

पंजाब कृषी विद्यापीठाने वाढत्या तापमानात तग धरू शकणारे पीबीडब्ल्यू-८२६ (PBW 826) हे गव्हाचे नवे वाण विकसित केले आहे.

Team Agrowon

मागच्या रब्बी हंगामातील तापमानवाढीमुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर कृषी संशोधकांनी वाढत्या तापमानात तग धरणाऱ्या पीबीडब्ल्यू-८२६ (PBW 826) गव्हाचे नवे वाण विकसित केले आहे.

मागच्या रब्बी हंगामात तापमानात झालेल्या वाढीमुळे गव्हाचे मोठे नुकसान झाले होते. ज्याचा मोठा फटका पंजाबसह सर्वच राज्यातील गहू उत्पादक शेतकऱ्यांना बसला होता. या पार्श्वभूमीवर पंजाब कृषी विद्यापीठाने वाढत्या तापमानात तग धरू शकणारे पीबीडब्ल्यू-८२६ (PBW 826) हे गव्हाचे नवे वाण विकसित केले आहे.

वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, रब्बी पिकांवरील संशोधन आणि विस्तार या विषयावर आयोजित दोन दिवशीय प्रदर्शनात कृषी विद्यापीठातर्फे या वाणाची माहिती देण्यात आली. एचडी ३०८६ आणि एचडी २९६७ या गव्हाच्या साधारण वाणापेक्षा पीबीडब्ल्यू-८२६ या वाणाचा गहू आकाराने ३१ टक्के मोठा आहे. तसेच एचडी ३०८६ आणि एचडी २९६७ या वाणांच्या तुलनेत या नवा वाणापासून १७ टक्के अधिक उत्पादन (production) मिळत असल्याचे यावेळी कृषी संशोधकांनी सांगितले. मागच्या चार वर्षांपासून पीबीडब्ल्यू-८२६ या वाणाच्या चाचण्या घेतल्या असून हे नवे वाण १४८ दिवसांत विकसित करण्यात आले आहे.

हे वाण सध्या राज्य सरकारच्या समितीकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आले असून त्यांनतर ते प्रत्यक्ष वापरासाठी शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे पंजाब कृषी विदयापीठाच्या (PAU) संशोधन विभागाचे संचालक डॉ. अजमेर सिंग दत्त यांनी सांगितले.

राज्यातील गव्हाचे उत्पादन (Wheat Production) वाढणार असा अंदाज होता. मात्र फेब्रुवारी आणि मार्च दरम्यानच्या तापमानवाढीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. भविष्यात अशा प्रकारचे नुकसान टाळायचे असेल तर वाढत्या तापमानात अधिक उत्पादन देणाऱ्या गव्हाच्या नव्या वाणाचा वापर करायला हवा, असा आग्रह पंजाब कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सतबीर सिंग गोसाल यांनी धरला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Massive Agricultural Crisis : बळीराजा उद्ध्वस्त! ८ लाख हेक्टरवरील पिके मातीमोल

Satara Rabi Season : सातारा जिल्ह्यात 'रब्बी'ची केवळ ५ टक्केच पेरणी पूर्ण; पाऊस गायब झाल्याने बळीराजा संकटात!

Nar-Par Girna Project : नार-पार, गिरणा नदीजोड प्रकल्पाला तीव्र विरोध; जमिनी आणि पाणी वाचवण्यासाठी शेतकरी एकवटले!

Agriculture Electricity : शेतीपंपांच्या विजेसाठी चामोर्शीत बळीराजा आक्रमक; संतप्त शेतकऱ्यांनी मुख्य रस्त्यावर केला चक्काजाम!

Hingoli Agriculture Crisis : हिंगोली जिल्ह्यात शेती वाचवा अभियान सुरू

SCROLL FOR NEXT