Agriculture Festival Agrowon
ताज्या बातम्या

Agriculture Festival : ‘पंदेकृवि’च्या कृषी महोत्सवात वाशीम ‘केव्हीके’चा सहभाग

डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जयंती दिनानिमित्त कृषी विद्यापीठात नुकत्याच झालेल्या पाच दिवसीय कृषी महोत्सवात येथील कृषी विज्ञान केंद्राने सहभागी होत शेतकऱ्यांना आपल्या उपलब्धींची माहिती दिली.

टीम ॲग्रोवन

वाशीम ः डॉ. पंजाबराव देशमुख (Dr. Panjabrao Deshmukh) यांच्या जयंती दिनानिमित्त कृषी विद्यापीठात नुकत्याच झालेल्या पाच दिवसीय कृषी महोत्सवात (Agriculture Festival) येथील कृषी विज्ञान केंद्राने सहभागी होत शेतकऱ्यांना आपल्या उपलब्धींची माहिती दिली.

शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचे तंत्र व फायदे प्रत्यक्ष पाहणीतून अवगत व्हावे या संकल्पनेतून दालन लावण्यात आले होते. यात गांडूळ खत, व्हर्मीवाश, गोकृपामृत, दशपर्णी अर्क, सोयाबीनपासून बनवलेले विविध पदार्थ, सोयाबीन सोंगणी हातमोजे, खुरपणी यंत्र, विविध पुस्तके, कृषी विद्यापीठाची दैनंदिनी, आवळा कॅंडी, आवळा लोणचे, अंबा लोणचे, मध इत्यादी प्रक्रिया उत्पादने तसेच नैसर्गिक शेती, हवामान माहिती, जलसंवर्धन इत्यादी मुद्द्यांवर जनजागृती केली.

कृषी विज्ञान केंद्राच्या दालनाला प्रधान सचिव (कृषी) एकनाथ डवले, कुलगुरू डॉ.शरद गडाख, शिक्षण विस्तार संचालक डॉ. डी. बी. उंदिरवाडे, सहयोगी संशोधन संचालक डॉ. ए. बी. कोल्हे, डॉ. सुरेंद्र काळबांडे, डॉ. विजय काळे, डॉ. वंदन मोहोड, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. मुरली इंगळे, आमदार अमोल मिटकरी, उपविभागीय कृषी अधिकारी नीलेश ठोंबरे, निनाद देशमुख या प्रमुखांसह शेतकऱ्यांनी भेट देऊन माहिती घेतली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

NHB Subsidy Cut: लेखाजोखा ‘एनएचबी’चा!

AI in Agriculture: कृषीतील एआय, रोबोटिक्स, ड्रोन तंत्रज्ञानाला नवी दिशा

POCRA Project Audit: ‘पोकरा’ प्रकल्पाचे पूर्ण लेखापरीक्षण करा: किशोर तिवारी

Women’s Freedom and Equality: स्त्रीला जोखडात बांधणारी विचारसरणी उखडून फेका: राहुल गांधी

Kharif Crop Growth: खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील पिके बहरली

SCROLL FOR NEXT