Sugarcane Agrowon
ताज्या बातम्या

Sugarcane : एकरी १०० टन ऊस उत्पादन मोहिमेत सहभागी व्हावे

एकरी १०० टन ऊस उत्पादन घेण्यासाठी कृषी विद्यापीठ तंत्रज्ञानाबाबत कृषी सहायक वर्षा क्षीरसागर (बोराटे) यांनी माहिती दिली.

टीम ॲग्रोवन

वडापुरी, ता. इंदापूर ः कृषी संजीवनी सप्ताहात इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी कृषी विभागातील योजना व एकरी १०० ऊस उत्पादन (100 Tonn Sugarcane Production Per Acer) मोहीमेत जास्तीत जास्त सहभागी व्हावे, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी भाऊसाहेब रूपनवर यांनी केले आहे.

रेडा ग्रामपंचायत कार्यालय येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती व कृषी संजीवनी सप्ताह निमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

एकरी १०० टन ऊस उत्पादन घेण्यासाठी कृषी विद्यापीठ तंत्रज्ञानाबाबत कृषी सहायक वर्षा क्षीरसागर (बोराटे) यांनी माहिती दिली. कृषी सहायक नवनाथ बोराटे यांनी सुपरकेन नर्सरी, पाचट कुजविणे, हिरवळीचे खत व बीजप्रक्रिया याबाबत मार्गदर्शन केले. बावड्याचे मंडल कृषी अधिकारी, जी. पी. सूर्यवंशी यांनी महाडीबीटी योजनेतील घटक व अनुदान प्रक्रिया यांची माहिती दिली. याप्रसंगी बाळासाहेब कोकणे यांनी प्रक्रिया योजना व अनुदान योजना माहिती दिली, तर बीबीएफ पेरणी प्रत्यक्षात वर्षा क्षीरसागर यांनी करून दाखविले.

या वेळी सरपंच सुनीता देवकर, पोलिस पाटील ज्योती भोसले, उपसरपंच सचिन देवकर यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT