Farmer Protest Agrowon
ताज्या बातम्या

Farmer Protest : परभणीत शेतकरी संघटनेचे बॅंकेसमोर ठिय्या आंदोलन

अनुदानाची रक्कम परस्पर कर्जखात्यात वळती

टीम ॲग्रोवन

परभणी : पंतप्रधान सन्मान निधी (पीएम किसान), (PM Kisan) ठिबक सिंचन योजना, दुष्काळ मदत अनुदान तसेच रोजगार हमी योजनेतील मजुरीची रक्कम शेतकऱ्यांच्या बचत खात्यातून परस्पर कर्जखात्यात वळती करणे बंद करावे, या मागणीसाठी शेतकरी संघटनेतर्फे सोमवारी (ता. २६) येथील इंडियन बँकेच्या (Indian Bank Prbhani) शाखेच्या दारावर रेडा, बैल बांधून बँकेत ठिय्या आंदोलन करण्यात आले.

इंडियन बँकेची जांब (ता. परभणी) येथील परभणी स्थित शाखा तसेच इतर बँका शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणारे पीएम किसान योजनेचे तसेच कृषी विभागाच्या विविध योजनांचे अनुदान, रोजगार हमीच्या कामावरील मजुरीची रक्कम

संबंधित शेतकऱ्यांना कुठली ही पूर्वसूचना न देता परस्पर बचत खात्यातून कर्ज खात्यामध्ये बेकायदेशीरपणे कपात करीत आहेत. शासनाच्या निर्णयानुसार लाभार्थ्यांना मिळणारी रक्कम अनुदान स्वरूपात असो अथवा मदत स्वरूपात असो अशी कोणती ही रक्कम

बँकेला बचत खात्यातून कर्ज खात्यात वर्ग येत नाही. ही बाब संबंधित बँक शाखा व्यवस्थापकांच्या निदर्शनास आणून देखील बँक अधिकारी आडमुठेपणाची भूमिका घेत लाभार्थ्यांना रक्कम देत नसल्यामुळे

शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमृत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हे अनोखे आंदोलन करण्यात आले. यात शेतकरी सहभागी झाले होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT