Eknath Shinde Agrowon
ताज्या बातम्या

Eknath Shinde : ‘पंढरपूर कॉरिडॉरची अंमलबजावणी होणार’

‘‘लाखो भाविकांच्या श्रद्धेचा विचार करून समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर कोणावरही अन्याय न होऊ देता पंढरपूर कॉरिडॉर पूर्णत्वास नेला जाईल,’’ अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषद सदस्य अमोल मिटकर यांनी उपस्थित केलेल्या लक्ष्यवेधीच्या उत्तरात दिली.

Team Agrowon

नागपूर ः ‘‘लाखो भाविकांच्या श्रद्धेचा विचार करून समृद्धी महामार्गा (Samruddhi Highway) च्या धर्तीवर कोणावरही अन्याय न होऊ देता पंढरपूर कॉरिडॉर (Pandharpur Corridor) पूर्णत्वास नेला जाईल,’’ अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी विधान परिषद सदस्य अमोल मिटकर यांनी उपस्थित केलेल्या लक्ष्यवेधीच्या उत्तरात दिली.

पंढरपूर कॉरिडॉरबाबत मिटकरी यांनी लक्ष्यवेधी मांडली. पंढरपूर कॉरिडॉर पुरातन वैभव अबाधित ठेवून या आराखड्याला अंतिम मान्यता देता येईल का? वारकरी सांप्रदायाला यामध्ये विचारात घेतले पाहिजे. त्यासोबतच नमामी चंद्रभागा योजना राबविल्यानंतरही अपेक्षित स्वच्छता झाली नाही. त्याबाबतही निर्णय व्हावा, अशी अपेक्षा मिटकरी यांनी व्यक्‍त केली. त्याला जोडूनच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पंढरपूरला विमानतळ करता येईल का, असा प्रश्‍न मांडला.

त्यावर उत्तर देताना मंत्री उदय सामंत म्हणाले, ‘‘वाराणसीच्या धर्तीवर पंढरपूरचा आराखडा तयार केला आहे. अंमलबजावणीवेळी होळकर व शिंदे वाड्याबाबत निर्णय घेतला जाईल. त्यसोबतच विमानतळाबाबतही सरकार सकारात्मक आहे.’’

शिंदे म्हणाले,‘‘ या ठिकाणी जागतिकस्तराच्या सुविधा देण्याचे प्रस्तावित आहे. त्यामध्ये आरोग्य केंद्र, उपकेंद्र, रस्ते, नदीची स्वच्छता व इतर विकासकामांचा समावेश केला आहे. हे करीत असताना स्थानिकांवर अन्याय होणार नाही. त्यामुळे सर्वांना विश्‍वासात घेऊन, मोबदला वाढवून देत, पुनर्वसन करून हा कॉरिडॉर अमलात आणला जाईल. काही व्यापाऱ्यांचा याला विरोध असला तरी त्यांना मोबदला दिला जाईल.`` सुरुवातीला या आराखड्यात ८५ हरकती, सूचना प्राप्त झाल्या होत्या. त्यानंतर ५९८ हरकती प्राप्त झाल्या. यातील ३६६ हरकती या रस्ता रुंदीकरणाबाबत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: ‘त्या’ शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचा लाभ; कृषिमंत्री भरणे यांची विधानसभेत माहिती

Monsoon Rain: पुणे जिल्ह्यातील दहा तालुक्यांत पावसाचा जोर

Defective Groundnut Seeds: निकृष्ट भुईमूग बियाणे बदलून मिळणार; कृषिमंत्र्यांच्या निर्देशाने शेतकऱ्यांना दिलासा

Dimbhe Dam Reservoir: डिंभे धरणक्षेत्रात ६७ मिमी पाऊस; पूर्व भागातील शेतकरी अजूनही जोरदार सरींच्या प्रतीक्षेत

Monsoon Alert: मॉन्सूनच्या पावसाला दमदार सुरुवात

SCROLL FOR NEXT