Crop Damage Agrowon
ताज्या बातम्या

Crop damage : शिरोळ तालुक्यात पंचनामे पूर्ण

१२५६ हेक्टरमधील पिकांचे नुकसान

Team Agrowon

कोल्हापूर : शिरोळ तालुक्यात परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे प्रशासनाच्या वतीने पूर्ण करण्यात आले. आठवड्याभरात युद्धपातळीवर करण्यात आलेल्या पंचनाम्यात तालुक्यातील ३५३० शेतकऱ्यांची १२५६ हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले आहे.

२१ ऑक्टोबर रोजी शिरोळ तालुक्यात ढगफुटीच्या झालेल्या पावसात प्रचंड नुकसान झाले होते. प्रशासनाच्या आदेशानुसार कृषी, महसूल, ग्रामविकास या विभागाच्या वतीने संयुक्तरीत्या युद्धपातळीवर सात दिवसांत पंचनामे पूर्ण करण्यात आले. यात नुकसानग्रस्त शेतकरी आणि त्यांच्या जमिनीची माहिती उपलब्ध झाली आहे.

शिरोळ तालुक्यात सहा महसूल मंडलांतील ४४ गावांपैकी ४२ गावांत ढगफुटी झाली होती. यात जयसिंगपूर, उदगाव, चिंचवाड, शिरोळ, शिरटी, अर्जुनवाड, नांदणी यांसह परिसरात शेतीचे प्रचंड नुकसान झाले होते. आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी नुकसान ग्रस्त भागाचे पंचनामे सुरू करण्याचे आदेश दिले होते.

तहसीलदार अपर्णा मोरे-धुमाळ, गटविकास अधिकारी शंकर कवितके, तालुका कृषी अधिकारी गणेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली ५९ कर्मचाऱ्यांकडून पंचनामे सुरू केले होती, ते बुधवारी (ता. २) पूर्ण झाले. यात १२५६ हेक्टरमधील ३५३० शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. तर जिरायतमध्ये १५०६ शेतकऱ्यांची ६०० हेक्टरमध्ये, बागायतीमध्ये ६४५.५५ हेक्टरमध्ये १९४५ शेतकरी, तर बहुवार्षिकमध्ये २५ हेक्टरमधील ३६ शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT