Paddy Harvesting Agrowon
ताज्या बातम्या

Paddy Harvesting : रायगड जिल्ह्यात भातकापणीला वेग

पाऊस थांबल्याने शेतकऱ्यांची लगबग; झोडपणीच्या कामांनाही सुरुवात

Team Agrowon

रसायनी : परिसरात सहा दिवसांपासून हवामानात बदल (Environmental Change) झाला आहे. पाऊस थांबला असून आकाश निरभ्र; कडक ऊन पडत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी दिवाळी सण साजरा झाल्यानंतर खरिपाच्या हंगामातील भातकापणीच्या कामांना (Paddy Harvesting) सुरुवात केली आहे.

अनेक शेतकऱ्यांनी लगबगीने भात पिकाचे कापणीची आणि पाठोपाठ दोन दिवसांनी झोडपणीची काम सुरू केली आहे. दरम्यान परतीच्या पावसाने भात पिकाचे काही शेतकऱ्यांचे नुकसान केले आहे.
परिसरातील वासांबे मोहोपाडा, चावणे, आपटे, वडगाव पंचक्रोशीतील शेतकरी खरिपाच्या हंगामात भाताचे पीक घेत आहे.

यावर्षी पाऊस वेळेत झाल्याने शेतकऱ्यांची भात लावणीची काम वेळेवर झाली. वेळेवर पाऊस पडल्याने पीकही चांगले आले. मात्र, कापणीसाठी पीक तयार होताच परतीच्या पावसाचा फटका बसला. पावसामुळे कापणीला आलेल्या भाताच्या पिकांचे नुकसान झाले, असे अनंता पाटील यांनी सांगितले.

आता हवामानात बदल झाला आहे. सहा दिवसांपासून वातावरण निवळले आहे. ऑक्टोबर महिन्याची हीट त्यात मध्येच गारवा जाणवत आहे. त्यामुळे पुन्हा निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बसेल, या भीतीने शेतकऱ्यांनी लगबगीने भातकापणीची कामे सुरू केली
आहेत. कापणीनंतर दोन दिवसांनी झोडपणीच्या कामांना सुरुवात केली जाणार असल्याचे सखाराम पाटील यांनी
सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT