Paddy Harveesting Agrowon
ताज्या बातम्या

Paddy Harvesting : सिंधुदुर्गात नवरात्रानंतर भातकापणी

सिंधुदुर्गा : जिल्ह्यात यावर्षी खरीप हंगामात ५५ हजार हेक्टरवर भातपीक लागवड करण्यात आली आहे. तीन टप्प्यांत भात रोपवाटिका तयार करण्यात येतात.

टीम ॲग्रोवन

सिंधुदुर्ग : जिल्ह्यात यावर्षी खरीप हंगामात ५५ हजार हेक्टरवर भातपीक लागवड (Paddy Cultivation) करण्यात आली आहे. तीन टप्प्यांत भात रोपवाटिका (Paddy Nursery) तयार करण्यात येतात. यामध्ये २० मे, त्यानंतर मॉन्सूनपूर्व पाऊस (Pre-Monsoon Rain) पाऊस पडल्यानतंर मे अखेरीला आणि मॉन्सून पाऊस (Monsoon Rain) सुरू झाल्यानंतर १० जूनला भात रोपवाटिका तयार करण्यात आल्या.

पहिल्या टप्प्यातील रोपांची पुनर्लागवड १० जूनपासून सुरू झाली. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील पूनर्लागवड २२ जून आणि तिसऱ्या टप्प्यातील पुनर्लागवड जुलैच्या पहिल्या आठवड्यात सुरू करण्यात आली. आता यातील पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील भातपिके परिपक्व स्थितीत आहेत.

परंतु सध्या नवरात्रोत्सव सुरू आहे. त्यामुळे परिपक्व स्थितीत असलेल्या भातपिकांची कापणी नवरात्रोत्सव संपताच सुरू होणार आहे. भातकापणीच्या अनुषंगाने शेतकऱ्यांनी पूर्वतयारी सुरू केली आहे. कोकणात कापणी केलेले भातपीक एकत्र करून ठेवण्यासाठी अंगणे तयार केली जातात.

ही अंगण तयार करण्याचे काम सध्या सुरू आहे. याशिवाय कापणीसाठी लागणाऱ्या कोयत्यांना धार काढणे, पेंड्या बांधण्यासाठी दोरीची तजवीस करणे, अशी कामे सध्या शेतकरी करीत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT