Paddy Cultivation Agrowon
ताज्या बातम्या

पवन मावळात चारसूत्री भात लागवड

आधुनिक तंत्रज्ञान (Modern Technology) वापरासाठी वेगवेगळे प्रयोग, प्रात्यक्षिक, शेतीशाळांच्या माध्यमातून जागृती केली. चारसूत्री, यांत्रिकीकरण, एसआरटी या लागवड पद्धतीचा प्रचार केला.

अॅग्रोवन वृत्तसेवा

पवनानगर : गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या पावसाचा शनिवार (ता.१६)पासून थोडा जोर कमी झाला आहे. त्यामुळे आठ दिवसांपासून रखडलेल्या भात लावणीच्या (Paddy Cultivation) कामांना वेग आला आहे.

मावळ तालुक्यातील पवन मावळ हे भाताचे कोठार समजले जाते. अनेक गावातील शेतकरी नियंत्रित लागवड करत आहेत. गेल्या पाच-सहा वर्षांत कृषी विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांत जागृती केली.

आधुनिक तंत्रज्ञान (Modern Technology) वापरासाठी वेगवेगळे प्रयोग, प्रात्यक्षिक, शेतीशाळांच्या माध्यमातून जागृती केली. चारसूत्री, यांत्रिकीकरण, एसआरटी या लागवड पद्धतीचा प्रचार केला. यामुळे चारसूत्री लागवड मोठ्या प्रमाणात झाली आहे. शेतकऱ्यांचा भात शेतीकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. आर्डव येथे कृषी सहाय्यक शीतल गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रगतशील शेतकरी शिवाजी आडकर यांच्या क्षेत्रावर एक हेक्टर क्षेत्रावर चारसूत्री लागवड करण्यात आली.

शिलिंब, अजीवली, मोरवे, जवण, शिवली, तिकोना, ठाकुरसाई, पाचाने, पुसाने, कुसगाव पमा, आढले, चांदखेड, डोने, उर्से, वारू, कडधे, शिरगाव, दारुंब्रे, गावांत चारसूत्री लागवड कृषिसहायकाच्या मार्गदर्शनाखाली चालू असल्याचे कृषी पर्यवेक्षक नंदकुमार साबळे, नागनाथ शिंदे यांनी सांगितले.

पवन मावळातील शेतकरी बऱ्याच दिवसांपासून चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत होते. परंतु, आता पावसाने विश्रांती घेतल्याने शेतकऱ्यांच्या भात लागवडीला पूर्ण वेग आला आहे. पवन मावळात तीन-चार हजार हेक्टर क्षेत्रावर नियंत्रित लागवड होणार आहे.
दत्तात्रेय शेटे, मंडळ कृषी अधिकारी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

MAGNET Project: शेतमालाचे मुल्यवर्धन, साठवणूक क्षमता वाढीसाठी साहाय्य; ९३ कोटी निधी मंजूर

Fake Seeds: बनावट बियाणे विक्रीला जरब

Farm Road Crisis: शेतरस्त्यासाठी शेतकरी पितापुत्राचा आत्मदहनाचा प्रयत्न

Water Conservation: जलस्रोतांसाठी व्यापक उपाययोजना करा

PM Kisan Scheme: ‘पीएम किसान’साठी ‘ॲग्रीस्टॅक’ बंधनकारक

SCROLL FOR NEXT