Paddy Agrowon
ताज्या बातम्या

Paddy Crop Damage : सिंधुदुर्गात ३०० हेक्टरवरील भातपिकाला अतिवृष्टीचा फटका

Paddy Plantation : गेल्या पंधरा दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू होता. सतत पडणाऱ्या पावसामुळे नदीकाठच्या शेकडो गावांतील शेतीमध्ये पाणी शिरले.

Team Agrowon

Sindhudurg News : जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे आतापर्यंत १०२ गावांतील ९४६ शेतकऱ्यांच्या ३०० हेक्टरवरील भातपिकाला फटका बसला आहे. जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडल्यामुळे या नुकसानीचे पंचनामे रखडले होते. दरम्यान नुकसानीचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू होता. सतत पडणाऱ्या पावसामुळे नदीकाठच्या शेकडो गावांतील शेतीमध्ये पाणी शिरले. भातरोप पुनर्लागवड केलेल्या क्षेत्रात अनेक दिवस पाणी साचल्यामुळे या पिकांचे मोठे नुकसान झाले.

कृषी विभागाने केलेल्या प्राथमिक सर्व्हेक्षणात आतापर्यंत १०२ गावांतील ९४६ शेतकऱ्यांच्या ३०० हेक्टर क्षेत्रावरील भातपिकांचे नुकसान झाले आहे.

या पिकांचे नुकसान झाले असले तरी अजूनही कृषी विभागाला नुकसानीचे पंचनामे करता आले नव्हते. सतत पडणाऱ्या पावसामुळे पंचनाम्यांच्या कामात अडथळा निर्माण झाला होता.

सद्यःस्थितीत ३०० हेक्टरवर नुकसान दिसत असले तरी शेकडो हेक्टरवर पिके अजूनही पाण्याखाली आहेत. त्यामुळे नुकसानीचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. पाऊस ओसरल्यानंतरच नुकसानीचा आकडा निश्चित होईल.

जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात भातपीक पाण्याखाली राहिलेले आहे. त्यामुळे या पिकांचे नुकसान झाले आहे. अजूनही अनेक गावांतील पिके पाण्याखाली आहेत. नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदशे जिल्हा कृषी अधीक्षक विजयकुमार राऊत यांनी कृषी सहायक, तालुका कृषी अधिकाऱ्यांना दिले आहेत.
- अरुण नातू, कृषितंत्र सल्लागार, सिंधुदुर्ग,

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT