Food Processing  Agrowon
ताज्या बातम्या

Food Processing : ‘अन्न प्रक्रिया उत्पादनांमध्ये पॅकेजिंग, ब्रॅण्डिंग गरजेचे’

Food Processing Industry : महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरीअंतर्गत कृषी विज्ञान केंद्र मोहोळ आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सोलापूरतर्फे नुकतेच “अन्न प्रक्रिया उद्योजकता विकास” प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले.

Team Agrowon

Solapur News : ‘‘अन्नप्रक्रिया उद्योगामध्ये भरपूर व्यावसायिक संधी आहेत. त्यामध्ये गुणवत्तापूर्ण उत्पादनासह पॅकेजिंग आणि ब्रॅण्डिंग आवश्यक आहे. त्यादृष्टीने उद्योजकांनी लक्ष देण्याची गरज आहे,’’ असे मत कृषी विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ दिनेश क्षीरसागर यांनी व्यक्त केले.

महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरीअंतर्गत कृषी विज्ञान केंद्र मोहोळ आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सोलापूरतर्फे नुकतेच “अन्न प्रक्रिया उद्योजकता विकास” प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले.

पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनांतर्गत जिल्हास्तरीय क्षमता बांधणी व प्रशिक्षण घटकांतर्गत जिल्हा स्तरीय समितीमार्फत शिफारशित मंजूर लाभार्थ्यांसाठी प्रशिक्षण आयोजिण्यात आले. त्याचे उद्‍घाटन ‘केव्हीके’चे कार्यक्रम समन्वयक डॉ. तानाजी वळकुंडे यांचे हस्ते झाले. काजल म्हात्रे, डॉ. शरद जाधव, डॉ. पंकज मडावी, डॉ. सूरज मिसाळ उपस्थित होते.

क्षीरसागर म्हणाले, ‘‘शाश्‍वत आर्थिक उत्पादनासाठी प्रक्रिया उद्योगातून कृषिमालाचे मूल्यवर्धन करणे गरजेचे आहे. केवळ उत्पादन करणे महत्त्वाचे नसून, स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी आणि व्यवसाय वाढीसाठी अन्न प्रक्रिया उद्योजकांनी आपल्या उत्पादनाचे आकर्षक पॅकेजिंग आणि ब्रॅण्डिंग करणे गरजेचे आहे. त्यावरच त्या उत्पादनाची विश्‍वासार्हता अवलंबून राहते. नव्या उद्योजकांनी त्याचे महत्त्व ओळखून काम करावे.’’

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Compensation Maharashtra : राज्यात ५ लाख एकर शेतीपिकांचं नुकसान; शेतकऱ्यांना लवकरात-लवकर मदत देणार, कृषिमंत्री भरणे यांची ग्वाही

Fertilizer Stock Approved: अकोला जिल्ह्यासाठी १.१४ लाख टन खत मंजूर

Kiwi Fruit Benefits: रोगप्रतिकारशक्ती वाढविणारे किवी

Sugarcane Worker Registration: बीड जिल्ह्यात ५८४५ ऊसतोड कामगारांची नोंदणी पूर्ण

Rain Mango Damage: पूर्वमोसमीचा तडाखा; आंब्यासह भाज्या मातीमोल

SCROLL FOR NEXT