Farm Mechanization  Agrowon
ताज्या बातम्या

Farm Mechanization : वावडेत यांत्रिकीकरणातून मजूरटंचाईवर मात

कांदा लागवडीसाठी निवडला यंत्राचा पर्याय

Team Agrowon


वावडे, जि. जळगाव ः दरवर्षी सप्टेंबर -ऑक्टोबर महिन्यात कांदा लागवडीला मोठ्या प्रमाणात सुरुवात होत असते. या स्थितीत वावडे (ता. अमळनेर) येथील चंद्रकांत पाटील या शेतकऱ्याने यावर यांत्रिकीकरणाचा पर्याय निवडला असून, यंत्राचा वापर करीत मंजूरटंचाईच्या समस्येवर मात केली आहे. कांदा लागवड यंत्रामुळे नऊ तासांत एक एकर कांदा लागवड करणे शक्य झाले आहे.

पाटील यांनी साडेतीन लाख खर्च करून कांदा लागवडीचे यंत्र खरेदी केले, क्षेत्र जास्त असल्यामुळे मोठ्या प्रमाणात मजुरीसाठी पैसेही खर्च होऊन वेळेवर मजूरही मिळत नव्हते. पर्यायाने कांदा रोपेही खराब होत होती, परंतु आता यंत्राद्वारे कांदा लागवड सुरू असल्याने नऊ तासांत एक एकर कांदा लागवड होत असून, त्यामध्ये कांदा लागवडीबरोबर सारेही पाडले जात असल्याने इतर खर्चातही बचत झाली आहे. एक एकर कांदा लागवडीसाठी ३० मजूर एक दिवसात कांदा लागवड करतात. तर, एक एकर कांदा लागवडीसाठी दहा ते अकरा हजार रुपये मोजावे लागत आहेत.

एक एकर कांदा लागवडीसाठी १६ ते १७ हजार रुपये खर्च येतो, पण आता मात्र या यंत्राद्वारे पाच मजूर बारा लिटर डिझेलमध्ये एक एकर कांदा लागवड करतात.
माझी दरवर्षी नऊ ते दहा एकर कांदा लागवड होत असते. त्यामुळे एवढ्या क्षेत्रासाठी मोठ्या प्रमाणात मजूरटंचाईला सामोरे जावे लागत होते आणि वेळेवर कामेही होत नव्हती, पण आता यंत्राद्वारे नऊ तासांत एक एकर कांदा लागवड होणार असल्याने एक एकरात कांदा लागवडीत साधारणपणे दहा ते बारा हजार रुपयांची बचत होणार असून, वेळेवर कांदा लागवड होणार आहे.
- चंद्रकांत पाटील, शेतकरी, वावडे, जि. जळगाव

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी ५ जुलैनंतरच, अटी, निकषांमध्ये बदल, कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत घोषणा

Turmeric Cultivation: जळकोट तालुक्यात शेतकऱ्यांची हळद लागवडीची लगबग

Agriculture Awards: नांदेडमधील चार शेतकऱ्यांना राज्यस्तरीय कृषी पुरस्कार जाहीर

Wildlife Management: जाळी लावून रोखला वन्यप्राण्यांचा उपद्रव

Smart Electricity Meter : वादातही सोलापूर मंडळात ४.१७ लाख स्मार्ट मीटर

SCROLL FOR NEXT