Crop Insurance Agrowon
ताज्या बातम्या

Crop Insurance : चार हजारांवर शेतकरी अग्रिम पीकविम्याच्या प्रतिक्षेत

जिल्ह्यातील सुमारे ६९ हजार सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पीकविम्याची अग्रिम रक्कम जमा करण्यात आली आहे.

Team Agrowon

परभणी ः जिल्ह्यातील सुमारे ६९ हजार सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या (Farmer) बँक खात्यावर पीकविम्याची अग्रिम रक्कम जमा करण्यात आली आहे. परंतु विविध प्रकारच्या त्रुटींमुळे अद्याप सुमारे ४ हजारांवर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर रक्कम झालेली नाही. त्रुटीच्या पूर्ततेनंतर उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा होईल, असे विमा कंपनीच्या प्रतिनिधींनी सांगितले.

पंतप्रधान पीकविमा योजनेतील मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थितीमुळे (मिड सीझन अॅडव्हर्सिटी) झालेले नुकसान या जोखीम बाबींअंतर्गत पावसाच्या खंडामुळे सोयाबीनच्या उत्पादनात ५० टक्क्यांपेक्षा जास्त घट आलेल्या जिल्ह्यातील सहा तालुक्यांतील आठ मंडलांतील ७३ हजार ८१४ शेतकऱ्यांना ४० कोटी एवढा अग्रिम विमा परतावा मंजूर करण्यात आला आहे.

या सर्वच मंडलांतील शेतकऱ्यांच्या खात्यावर गेल्या काही दिवसात अग्रिम परताव्याची रक्कम जमा झालेली आहे. परंतु विमा प्रस्ताव दाखल करताना अनेक शेतकऱ्यांचे बँक खाते क्रमांक, आधार क्रमांक चुकीचे नमूद करण्यात आले आहेत. त्यामुळे रक्कम जमा होत नाही. परंतु अनेक शेतकऱ्यांच्या प्रस्तावात कोणत्याही चूक नसतानाही विमा कंपनीकडून रक्कम जमा करण्यात आलेली नाही.

त्यामुळे शेतकरी विमा कंपनीकडे तक्रार करत आहेत.. नेमक्या कोणत्या त्रुटी आहेत हे देखील येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल, असे विमा कंपनीचे प्रतिनिधी सांगत आहेत. यंदाच्या ऑगस्ट महिन्यात जिल्ह्यातील झरी (ता. परभणी), सिंगणापूर (ता.परभणी), जांब (ता.परभणी), दूधगाव (ता. जिंतूर, रामपुरी (ता. मानवत), सोनपेठ (ता. सोनपेठ), माखणी (ता. गंगाखेड), चुडावा (ता. पूर्णा) या ८ महसूल मंडलात २१ ते २६ दिवस पावसाचा खंड पडला होता.

त्यामुळे शासकीय कर्मचारी तसेच विमा कंपनीचे प्रतिनिधी यांनी केलेल्या संयुक्त पाहणीनुसार या मंडलातील सोयाबीनच्या मागील ७ वर्षांतील सरासरी उत्पादकतेच्या तुलनेत यंदाच्या सरासरी उत्पादनात ५२ ते ५७ टक्के घट झाल्याचे आढळून आले.

त्यामुळे या मंडलातील शेतकऱ्यांना पीकविमा योजनेतील प्रतिकूल परिस्थितीमुळे झालेले नुकसान या जोखीम बाबींअंतर्गत संभाव्य विमाभरपाई पैकी २५ टक्के अग्रिम रक्कम एक महिन्याच्या आत देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी गोयल यांनी आयसीआयसीआय लोम्बार्डं जनरल विमा कंपनीला ९ सप्टेंबर रोजी काढलेल्या अधिसूचनेद्वारे दिले होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Compensation: कोकणातील १ लाख ३४ हजार शेतकऱ्यांना दिलासा; २०९ कोटी मदत मंजूर, शासन निर्णय जारी

Nashik Rain Update: नाशिक जिल्ह्यात सर्वदूर पावसाची हजेरी

Paddy Sowing: भात पेरणीची घाई करू नका

Palghar Rain Update: पावसाच्या प्रतीक्षेला अखेर विराम

Tur MSP Procurement: शेतकऱ्यांकडून तुरीची हमीभावापेक्षा कमी दरात खुल्या बाजारात विक्री?; पणनमंत्र्यांकडून महत्त्वाचा खुलासा

SCROLL FOR NEXT