Chana Disease Agrowon
ताज्या बातम्या

Chana Disease : हरभरा पिकावर ‘मर’ रोगाचा प्रादुर्भाव

मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत यंदा हरभऱ्याची १३ लाख हेक्टरवर पेरणी झाली. पेरणी झालेल्या क्षेत्रापैकी लातूर कृषी विभागातील लातूर, नांदेड तसेच औरंगाबाद कृषी विभागातील बीड जिल्ह्याच्या काही भागात मर रोगाचा प्रादुर्भाव आढळून आला आहे.

टीम ॲग्रोवन

औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत यंदा हरभऱ्याची (Chana Cultivation) १३ लाख हेक्टरवर पेरणी झाली. पेरणी झालेल्या क्षेत्रापैकी लातूर कृषी विभागातील (Agriculture Department) लातूर, नांदेड तसेच औरंगाबाद कृषी विभागातील बीड जिल्ह्याच्या काही भागात मर रोगाचा प्रादुर्भाव (Wilt Disease) आढळून आला आहे.

मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत हरभऱ्याचे सर्वसाधारण क्षेत्र १० लाख २२ हजार ९६५ हेक्टर इतके आहे. त्यामध्ये औरंगाबाद कृषी विभागातील २,३६,८४१ हेक्टर तर लातूर कृषी विभागातील ७ लाख ८६ हजार १२४ हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे. प्रत्यक्षात मराठवाड्यात १३ लाख १४ हजार २१ हेक्‍टरवर हरभऱ्याची पेरणी झाली. त्यामध्ये औरंगाबाद कृषी विभागातील २ लाख ८६ हजार ३२९ हेक्टर तर लातूर कृषी विभागातील १० लाख २७ हजार ६९२ हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे.

दोन्ही विभागांत सर्वसाधारण क्षेत्राच्या पुढे जाऊन पेरणी झाली आहे. पेरणी झालेल्या या हरभऱ्याच्या क्षेत्रामध्ये बीजप्रक्रिया करून पेरणी केलेल्या शेतकऱ्यांच्या शेतावर कमी प्रमाणात तर बीज प्रक्रिया न करता पेरणी केलेल्या शेतकऱ्यांच्या शेतावर जास्त प्रमाणात मरचा प्रादुर्भाव असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. मध्यंतरी गायब झालेल्या थंडीने व ढगाळ वातावरणामुळे कीड-रोगांनाही आमंत्रण देण्याचे काम केल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

आमच्या शिवारात शेवटच्या टप्प्यातील अति पावसाने ओल हटलीच नाही. त्यामुळे बीजप्रक्रिया केलेल्या शेतात पाच ते दहा टक्क्यांपर्यंत तर बीजप्रक्रिया न केलेल्या शेतात २५ ते ३० टक्क्यांपर्यंत हरभरा पिकात मर आढळून आली आहे.

- रवींद्र देवरवाडे, देवळा, ता. अंबाजोगाई, जि. बीड

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT