VP Bio-Technology College Agrowon
ताज्या बातम्या

Bio-Tech International Conference : बायोटेक्नॉलॉजी फॉर बेटर टुमारो विषयावर आंतरराष्ट्रीय परिषद

विद्या प्रतिष्ठानच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त बालीमध्ये आयोजन

टीम ॲग्रोवन

बारामती, जि.पुणे ः विद्या प्रतिष्ठानच्या (Vidya Pratishtan Baramati) सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आज (ता. २९) व रविवारी (ता. ३०) इंडोनेशियातील बालीमधील उधायाना विद्यापीठ आणि विद्या प्रतिष्ठानचे (Udhayana University and Vidya Pratishthan) कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय आणि मायक्रोबायोलॉजिस्ट सोसायटी इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने ‘बायोटेक्नॉलॉजी फॉर बेटर टुमारो’ या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती प्राचार्य डॉ. भरत शिंदे (Dr. Bharat Shinde) यांनी दिली.

या परिषदेचे उद्घाटन संस्थेच्या विश्वस्त सुनेत्रा पवार व इंडोनेशिया येथील उधायाना विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. नी लूह वातीनीयासी यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. तर, डॉ. राकेश त्रिवेदी यांच्या बीजभाषणाने या आंतरराष्ट्रीय परिषदेची सुरुवात होणार आहे.या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी आशिया खंडातील १३० संशोधक सहभागी झाले आहेत.

त्यापैकी ५२ संशोधक ऑफलाइन व ७८ संशोधक ऑनलाइन पद्धतीने आपले शोध निबंध सादर करणार आहेत. या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये एकूण १६ तज्ज्ञ वक्त्यांची व्याख्याने आयोजित करण्यात आली आहेत. देशभरातून १६ प्राध्यापक, ४ संशोधन संस्थांचे संचालक संशोधकांना मार्गदर्शन करणार आहेत.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भरत शिंदे, मायक्रोबायोलॉजिस्ट सोसायटी इंडियाचे अध्यक्ष डॉ. अरविंद देशमुख, तसेच आंतरराष्ट्रीय परिषदेच्या अध्यक्षा डॉ. रेटनो, डॉ. कीर्ती आफळे, सूक्ष्मजीवशास्त्र विभागाच्या विभाग प्रमुख नीलिमा पेंढारकर, उपप्राचार्य डॉ. लालासाहेब काशीद, नीलिमादेवी, डॉ. संजय कांबळे आणि इतर सर्व संयोजन समिती सदस्यांनी नियोजन केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Inspection: जिल्हाधिकारी शेताच्या बांधावर; पीक पाहणी करून साधला संवाद

Sustainable Aviation Fuel Project: शाश्वत विमान इंधन निर्मिती प्रकल्प ‘नॅचरल’ उभारणार; बी. बी. ठोंबरे यांची माहिती

Crop Insurance Compensation: हवामान मापक यंत्रावरील नोंदणी ग्राह्य धरून पीकविमा परतावा द्या : महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

Railway Protest: रेल्वेचा निर्णय होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार; संगमनेरकरांचा इशारा

Weekly Weather: महाराष्ट्रातून मॉन्सून बाहेर पडण्याच्या मार्गावर

SCROLL FOR NEXT