FMD Agrowon
ताज्या बातम्या

Animal Care : लाळ्या-खुरकूत नियंत्रण जागृती सप्ताहाचे आयोजन

FMD Disease : पशुसंवर्धन विभागाद्वारे ११ ते १७ सप्टेंबर या कालावधीत राष्ट्रीय लाळ्या-खुरकूत आजार नियंत्रण जागृती सप्ताह साजरा करण्यात येणार आहे.

Team Agrowon

Pune News : पशुसंवर्धन विभागाद्वारे ११ ते १७ सप्टेंबर या कालावधीत राष्ट्रीय लाळ्या-खुरकूत आजार नियंत्रण जागृती सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. या अंतर्गत पशुपालक, पशुवैद्यक, स्वयंसेवी संस्था, पशुवैद्यकीय कर्मचारी, लसीकरण करणारे सेवादाता यांचे जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात येतील.

‘‘लाळ्या-खुरकूत हा गायवर्ग, म्हैस वर्ग, शेळ्या, मेंढ्या, वराह यांसारख्या दोन खूर असलेल्या प्राण्यांमधील एक संसर्गजन्य विषाणूजन्य आजार आहे. या रोगाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना, लसीकरण आदींसाठी जागृती सप्ताहात राज्यातील सर्व पशुरोग निदान प्रयोगशाळा ऑनलाइन प्रशिक्षण आयोजित करणार आहेत.

यापूर्वी प्रादुर्भाव झालेल्या गावांतही शिबिरे व व्याख्याने आयोजित केली जातील,’’ असे पशुसंवर्धन विभागाच्या औंध येथील रोग अन्वेषण विभागाचे सह-आयुक्त पशुसंवर्धन डॉ. याह्या खान-पठाण यांनी सांगितले.

‘‘लाळ्या-खुरकूतच्या विषाणूचा पशुधनाच्या शरिरात प्रवेश झाल्यानंतर एक ते पंधरा दिवसांत रोगाची प्रत्यक्ष लक्षणे दिसू शकतात. पशूंना १०२- १०६ अंशांपर्यंत तीव्र ताप येतो. जनावरे चारा खाणे बंद करता. तोंडातून दोरीसारखी लाळ गळू लागते. जिभेवर, हिरड्यावर, तोंडातील आतील भागावर, कासेवर, खुरामध्ये फोड येतात. एक दोन दिवसांत हे फोड फुटतात आणि त्या ठिकाणी अल्सरसारखी जखम होते. या जखमांमुळे जनावरांना चारा खाता येत नाही, जनावरे अशक्त होतात. या लक्षणांकडे पशुपालकांनी लक्ष द्यावे,’’ असे आवाहन करण्यात आले.

खुरांमधील जखमा वेदनादायी असल्याने बऱ्याच वेळा जनावरे पाय वर धरतात. या जखमांवर माश्यांनी अंडी घातली तर तिथे अळ्या पडतात. या अवस्थेत जिवाणूंची बाधा होऊन जखमा चिघळतात व कित्येक दिवस त्या बऱ्या होत नाहीत.

लहान वासरांमध्ये या रोगाची बाधा झाली तर हृदयाचे स्नायू निकामी झाल्याने ती काहीही लक्षणे न दाखविताच मरण पावतात. लहान वासरांमध्ये ५० टक्क्यांपर्यंत मरतूक होऊ शकत असल्याने त्यांची विशेष काळजी घ्यावी, असेही पशुसंवर्धन विभागातर्फे सांगण्यात आले.

रोगप्रतिबंधक उपाय असे...

- लाळ्या-खुरकूत येऊ नये म्हणून पशुधनाला दर सहा महिन्यांच्या अंतराने वर्षांतून दोन वेळा लसीकरण करावे

- गाभण गाई, म्हशींना लाळ्या-खुरकूत प्रतिबंधक लस दिली गेली तर त्या गाईच्या होणाऱ्या वासरांचे जन्मानंतर काही काळ आजारापासून संरक्षण होते.

- वासरे चार महिन्यांची झाली की त्यांना लसीची पहिली मात्रा द्यावी आणि एक महिन्यानंतर लसीची दुसरी मात्रा (बूस्टर डोस) द्यावा.

- लसीचा योग्य प्रभाव दिसण्यासाठी लसीकरणापूर्वी एक महिना जनावरांना जंतुनाशके पशुवैद्यकांच्या सल्ल्याने द्यावीत.

- जनावरांना पुरेसा सकस चारा व पशुखाद्य द्यावे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: सरकीचा भाव तेजीत; कापूस टिकून, सोयाबीनमध्ये चढ उतार, खरबूजाला उठाव तर टोमॅटो आवक टिकून

Orchards Rain Damages: पावसाचा फळबागांचा फटका

khandesh Water Storage: मध्यम, लघु प्रकल्पांत जलसाठा ५० टक्क्यांपर्यंत

Maharashtra Rain Prediction: पूर्व विदर्भात ५ दिवस पावसाचा अंदाज; उद्यापासून राज्यात पावसाचे वातावणर निवळण्याची शक्यता

Unseasonal Rain Crisis: वादळी पावसाचा तिसऱ्यांदा तडाखा

SCROLL FOR NEXT