Organic Certification Agrowon
ताज्या बातम्या

सेंद्रिय शेतमाल प्रमाणीकरण यंत्रणा दिवाळीपूर्वी कार्यान्वित

राज्यात सेंद्रिय शेतमाल उत्पादनाला मिळणार चालना

Vinod Ingole

नागपूर ः बियाणे प्रमाणीकरणासोबतच (Seed Certification) राज्यात सेंद्रिय शेतीमालाच्या प्रमाणीकरणासाठी (Organic Certification) स्वतंत्र यंत्रणेची स्थापना करण्यात येणार आहे. त्यासंबंधीची घोषणा राज्य सरकारने यापूर्वीच केली असून, लवकरच संस्था नोंदणी कायद्यांतर्गत नोंदणी होत दिवाळीपूर्वी या यंत्रणेचे कामकाज सुरू होण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.

आरोग्याप्रती जागरूकता वाढीस लागल्या ग्राहकांकडून सेंद्रिय शेतीमालाविषयी विचारणा होऊ लागली आहे. त्यासाठी वाट्टेल ती किंमत मोजण्यासही ग्राहक तयार आहेत. मात्र त्यानंतरही त्यांना मिळणारा शेतीमाल हा सेंद्रिय आहे किंवा नाही याविषयी खात्री देणारी यंत्रणाच नाही. सध्या काही खासगी संस्थांच्या माध्यमातून सेंद्रिय शेतमाल प्रमाणीकरण करून घेतला जातो. परंतु असा प्रमाणित शेतीमाल विकणारे शेतकरीदेखील बोटावर मोजण्याइतक्याच संख्येत आहेत. त्यामुळे राज्य सरकारने बीज प्रमाणीकरण यंत्रणेच्या धर्तीवर सेंद्रिय शेतीमाल प्रमाणीकरणासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्याचा निर्णय घेतला. त्या संबंधीची प्रक्रिया आता पूर्णत्वास गेली आहे. बीज प्रमाणीकरण यंत्रणेप्रमाणेच याकरिता देखील संस्था नोंदणी करावी लागणार आहे. त्यासाठी अध्यक्ष, सदस्य सचिव व सदस्य अशा ११ जणांचा समावेश असलेली कार्यकारिणी निश्‍चित करण्यात आली आहे.

२०१५-१६ पासूनच सेंद्रिय शेतमाल प्रमाणीकरणाच्या हालचाली सुरू होत्या. बीज प्रमाणीकरण यंत्रणेकडेच हे काम असावे, असे प्रस्तावित होते. परंतु अपेडाने सेंद्रिय शेतीमाल प्रमाणीकरणासाठी स्वतंत्र यंत्रणेची अट घातली त्यामुळे हे काम रखडले होते. आता ते मार्गी लागल्याने राज्यात सेंद्रिय शेतीमाल उत्पादनाला चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्‍त केली जात आहे. विशेष म्हणजे २०१५-१६ मध्ये सेंद्रिय शेतीमाल प्रमाणीकरणाच्या उद्देशाने आवश्यक असे वर्किंग आणि क्‍वालिटी मॅन्युअल तयार करण्यात आले होते.

दरम्यानच्या काळात अपेडाकडून कार्यपद्धतीत काही बदल झाल्याने त्यानुसार या कार्यपुस्तिकेत सुधारणा कराव्या लागणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. हे बदल किरकोळ स्वरूपाचे असल्याने संस्था नोंदणीनंतर ते अल्पावधीतच होणार असल्याने यंत्रणेचे कामकाज दिवाळीपर्यंत सुरू होईल, असे सांगण्यात आले. राज्य बीज प्रमाणीकरण यंत्रणेचे मुख्यालय अकोल्यात असून त्याच इमारतीमधून सेंद्रिय शेतीमाल प्रमाणीकरण यंत्रणेचे कामकाज चालणार आहे. बीज प्रमाणीकरण यंत्रणेतील १५ कर्मचाऱ्यांचे हस्तांतर नव्या यंत्रणेत केले जाणार आहे. नवीन पदभरती शासन यासाठी करणार नाही, त्यामुळे दोन्ही यंत्रणांवर ताण वाढण्याची भीती वर्तविली जात आहे.

...अशी राहील कार्यकारिणी

सेंद्रिय शेतीमाल प्रमाणीकरण यंत्रणेमध्ये सचिव (कृषी) अध्यक्ष, तर सदस्यांमध्ये कृषी आयुक्‍त, विस्तार शिक्षण संचालक, चारही विद्यापीठांतील सेंद्रिय शेती संशोधन विभागाचे प्रमुख यांच्यासह सदस्य म्हणून सचिव बीज प्रमाणीकरण यंत्रणेचे संचालक, सेंद्रिय शेती कार्यरत संस्थांचे तीन अशासकीय सदस्य याप्रमाणे ११ जणांचा समावेश राहणार आहे.

संस्थेची कार्यकारिणी अंतिम झाली असून, मे महिन्यात संस्था नोंदणीची प्रक्रिया पूर्णत्वास जाईल. त्यानंतर अपेडाकडे ॲक्रिडेशनसाठी प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. त्याला दिवाळीपर्यंत मान्यता मिळेल, अशी अपेक्षा आहे. त्यानंतर राज्यात सेंद्रिय शेती प्रमाणीकरणाचे काम सुरू होईल. उत्तराखंड, राजस्थान, मध्य प्रदेश यासह सात ते आठ राज्यांमध्ये सध्या स्वतंत्र सेंद्रिय प्रमाणीकरण यंत्रणा आहेत.
विलास रेणापूरकर, संचालक, महाराष्ट्र राज्य बीज प्रमाणीकरण यंत्रणा, अकोला

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Weather : किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता

Election 2024 Maharashtra: सुरुवातीच्या कलात महायुतीचं पारडं जड; महाविकास आघाडी देते टक्कर

Sugarcane Harvesting : निवडणूक आटोपली, खानदेशात ऊस तोड सुरू करा

Cashew Cluster Scheme : सिंधुदुर्ग-रत्नागिरीसाठी काजू क्लस्टर योजना

Banana Export : करमाळ्यातून केळीचा पहिला कंटेनर रशियाला रवाना

SCROLL FOR NEXT