Orange  Agrowon
ताज्या बातम्या

Crop Damage Compensation : संत्रा बागायतदारांना हवी हेक्‍टरी लाखाची भरपाई

Orange Crop Damage : मोर्शी तालुक्‍यात एप्रिल, मे महिन्यांत झालेल्या गारपिटीमुळे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले.

Team Agrowon

Amaravati News : मोर्शी तालुक्‍यात एप्रिल, मे महिन्यांत झालेल्या गारपिटीमुळे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. परिणामी संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना हेक्‍टरी एक लाख रुपये देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना गुरुवारी (ता.३१) पाठविलेल्या निवेदनातून ही मागणी करण्यात आली आहे. निवेदनानुसार, संत्रा झाडावर असलेल्या आंबिया बहाराच्या फळाला गळती लागली. जुलै महिन्यात संत्रा बागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढला.

त्याच्या परिणामी गळ झाली. संत्रा बागांचे नुकसान झाल्याने मोर्शी तालुक्‍यात कृषी विभागाच्या माध्यमातून पंचनाम करून संत्रा उत्पादकांना भरपाई मिळाली पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेसचे मोर्शी तालुका उपाध्यक्ष तसेच ग्रामपंचायत सदस्य रूपेश वाळके यांच्या नेतृत्वात संत्रा बागायतदारांनी हे निवेदन मुख्यमंत्र्यांना पाठविले आहे.

वरुड, मोर्शी तालुक्यांत गळ

अमरावती जिल्ह्यातील वरुड, मोर्शी तालुके हे संत्रा लागवडीसाठी प्रसिद्ध आहेत. सुमारे ६५ हजार हेक्‍टरवर संत्रा लागवड आहे. याच तालुक्‍यातील बागांमध्ये गळ सर्वाधिक झाली आहे. परिणामी नुकसान भरपाईची मागणी बागायतदार करीत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Relief : पिण्याचे पाणी, पीक नुकसान, चारा व्यवस्थापनावर भर

Gaushala Empowerment : गो-१० संकल्पा’तून गोशाळांना आर्थिक स्वावलंबनाचे बळ

Seed Planning : रब्बी हंगामासाठी ७,७८४ क्विंटल बियाण्यांचे नियोजन

Sugarcane Price : ‘नॅचरल’कडून उसाला पहिली उचल ३,३०० रुपये

Sangli Development : सांगली जिल्ह्यात २८ हजार कामांना मान्यता

SCROLL FOR NEXT