Dhananjay Mahadik Agrowon
ताज्या बातम्या

Bhima Co-operative Sugar Factory : भीमा’च्या निवडणुकीत खासदार महाडीकांना विरोधकांचे आव्हान

महाडीक यांनीही भीमा शेतकरी विकास आघाडीच्या माध्यमातून पॅनेल उभा करत हे आव्हान स्वीकारले आहे. त्यामुळे या दोन्ही पॅनेलमध्ये निवडणुकीची रंगत चांगलीच वाढणार आहे.

Team Agrowon

सोलापूर ः टाकळी सिकंदर (ता. मोहोळ) येथील भीमा सहकारी साखर कारखान्याच्या (Bhima Co-operative Sugar Factory) संचालक मंडळ निवडणुकीत कारखान्याचे विद्यमान चेअरमन, खासदार धनंजय महाडीक ( Dhananjay Mahadik) यांनी विरोधकांना बिनविरोधासाठी केलेले आवाहन धुडकावले असून, विरोधी गटाने भीमा बचाव शेतकरी पॅनेल उभा करून महाडीक यांना उलट आव्हान दिले आहे. तर आता महाडीक यांनीही भीमा शेतकरी विकास आघाडीच्या माध्यमातून पॅनेल उभा करत हे आव्हान स्वीकारले आहे. त्यामुळे या दोन्ही पॅनेलमध्ये निवडणुकीची रंगत चांगलीच वाढणार आहे.

भीमा कारखान्याच्या १५ जागांसाठी ही निवडणूक होत आहे. गेल्या महिनाभरापासून सातत्याने चेअरमन, खासदार महाडीक हे विरोधकांना निवडणूक बिनविरोध करण्यासाठी आवाहन करत होते. पण त्यांचे विरोधक माजी आमदार राजन पाटील आणि माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी त्यांना दाद दिली नाही. या निवडणुकीसाठी ११४ उमेदवारी अर्ज शिल्लक राहिले होते. पण गुरुवारी (ता. ३) उमेदवारी मागे घेण्याच्या शेवटच्यादिवशी ७९ जणांनी निवडणुकीतून माघार घेतली. पण त्यात पाटील, परिचारक समर्थकांनी माघार घेतली नाही. त्यांच्यासह ३५ उमेदवार निवडणूक रिंगणात राहिल्याचे चित्र स्पष्ट झाले. तसेच पुढच्या काही वेळातच माजी आमदार पाटील आणि माजी आमदार परिचारक यांनी भीमा बचाव पॅनेलची घोषणा केली. त्यानंतर महाडीक यांनीही भीमा शेतकरी विकास आघाडी जाहीर केली. त्यामुळे या दोन्ही पॅनेलमध्ये निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले.

खासदार महाडीक यांनी पहिल्यांदाच त्यांचे पुत्र विश्‍वराज यांना पुळूज गटातून उभे केले आहे. त्यांना भीमाचे उपाध्यक्ष राहिलेले कल्याणराव पाटील यांनी आव्हान दिले आहे. तर स्वतः खासदार धनंजय महाडीक संस्था मतदार संघातून उभे आहेत. त्यांना राजेंद्र चव्हाण यांचे आव्हान आहे. कारखान्याचे विद्यमान व्हाइस चेअरमन सतीश जगताप अंकोली गटातून उभे आहेत. त्यांना भारत पवार यांचे आव्हान आहे. परिचारक गटाचे दिलीप घाडगे यांनी त्यांच्या पत्नी अर्चना घाडगे यांना मैदानात उतरवले आहे. एकूणच खासदार महाडीक आणि माजी आमदार पाटील, माजी आमदार परिचारक यांच्या दोन्ही पॅनेलमध्ये ही निवडणूक चांगलीच रंगण्याची चिन्हे आहेत. कारखान्याचे सुमारे १९ हजार ३८७ मतदार असून, येत्या १३ नोव्हेंबरला मतदान आणि १४ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे.

खासदार महाडीकांसह, पाटील परिचारकांची प्रतिष्ठा पणाला

माजी आमदार राजन पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत, खासदार महाडीक आणि माजी आमदार राजन पाटील यांचे पूर्वीपासून राजकीय वैर आहे. त्यात माजी आमदार परिचारक आणि खासदार महाडीक हे सध्या भाजपमध्ये आहेत. त्यामुळे परिचारक महाडीकांना साथ देतील, अशी शक्यता होती. पण पक्षापेक्षा स्थानिक राजकारण विचारात घेत परिचारक यांनी माजी आमदार पाटील यांना साथ दिल्याचे दिसते. पण या निवडणुकीच्या निमित्ताने आता या तीनही नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Nanded Crop Insurance : नांदेडमधील पीकविमा परतावा वितरणासाठी मुहूर्त ठरेणा

Fish Farming : कृषी विभागातर्फे शेती, मत्स्यपालनाचे धडे

Paddy Plantation : पावसामुळे मुरूड तालुक्यातील भात लावणीचे काम पूर्ण

Crop Insurance Scheme : सांगली जिल्ह्यात ८१ हजार शेतकऱ्यांनी घेतला पीकविमा

Banana Crop Insurance : केळीविमाधारकांच्या परताव्यांना विलंब शक्य

SCROLL FOR NEXT