Crop Damage Agrowon
ताज्या बातम्या

Crop Damage : दहा हजार पूर्वसूचनांपैकी केवळ ५३२ पंचनामे

नैसर्गिक आपत्तीत पिकांचे ५० टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाल्यास २५ टक्के रक्कम पीकविमा कंपन्यांकडून आगाऊ स्वरूपात दिली जाते. गेल्या हंगामात बहुतांश शेतकऱ्यांना अशा प्रकारची भरपाई देण्यात आली होती.

टीम ॲग्रोवन

अमरावती : जुलै महिन्यात संततधार, तर ऑगस्ट महिन्यात एक-दोन दिवसाआड होणाऱ्या पावसामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान (Karif Crop Damage) झाले. त्या पार्श्‍वभूमीवर विमा भरपाई (Insurance Compensation) मिळावी, यासाठी जिल्ह्यातील दहा हजार ४६५ शेतकऱ्यांनी ७२ तासांच्या आत पूर्वसूचना (Intimation) अर्ज दिले. यातील केवळ ५३२ शेतकऱ्यांचे पंचनामे (Crop Damage Surveys) करण्यात आल्याने भरपाई केव्हा मिळणार, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

नैसर्गिक आपत्तीत पिकांचे ५० टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाल्यास २५ टक्के रक्कम पीकविमा कंपन्यांकडून आगाऊ स्वरूपात दिली जाते. गेल्या हंगामात बहुतांश शेतकऱ्यांना अशा प्रकारची भरपाई देण्यात आली होती. यंदा ५५ महसूल मंडलात अतिवृष्टी झाली आहे.

संततधार पावसाने अडीच लाख हेक्टरमधील पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले. ऑगस्ट महिन्यातील सर्वेक्षण व पंचनामे बाकी आहेत. त्यामुळे या क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे. पीक नुकसानीच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी विमा भरपाईसाठी नियमानुसार कंपनीला पूर्वसूचना दिली आहे.

निकषाप्रमाणे भरपाई द्या

पीकविमा योजनेत यंदा ‘कप अँड कॅप’ मॉडेल आहे. योजनेत जिल्ह्यातील ६४२५ कर्जदार व दोन लाख दहा हजार ९२८ बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवत २०.२१ कोटीचा हप्ता जमा केला आहे. या शिवाय केंद्र व राज्य शासनाचा मिळून १०४.६५ कोटींचा विमा हप्ता कंपनीकडे जमा होईल. त्यामुळे निकषाप्रमाणे भरपाई मिळावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

अमरावती जिल्ह्यातील पीकविमा स्थिती :

- सहभागी शेतकरी २ लाख १७ हजार ३५३

- विमा संरक्षित क्षेत्र : एक लाख ९३ हजार ७३६ हेक्टर

- विमा रक्कम : ८८४.२६ कोटी

- शेतकरी हिस्सा : २०.२१ कोटी

- एकूण विमा हप्ता : १४२.२९ कोटी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Relief: नाशिकसह तीन जिल्ह्यांतील १ लाख ४५ हजार शेतकऱ्यांना दिलासा, ८६ कोटी ६५ लाख मदत मंजूर

Agri University Research : कृषी विद्यापीठाची संशोधनात ओळख अधिक बळकट होईल

Ring Road Project : रिंग रोड बाधितांचा शासनाविरोधात एल्गार

Murrah Buffalo Subsidy: मुऱ्हा म्हैस खरेदीसाठी ‘चितळे’ देणार अनुदान

Kisan Credit Card : किसान क्रेडिट कार्ड, पशू किसान क्रेडिट कार्डातील अडचणी सोडवा

SCROLL FOR NEXT