Sugarcane FRP Agrowon
ताज्या बातम्या

Sugarcane FRP : केवळ १८ कारखान्यांनी दिली एकरकमी ‘एफआरपी’

हंगामाच्या पहिल्या महिन्यानंतरची राज्यातील स्थिती

Radhika Mhetre, राजकुमार चौगुले: ॲग्रोवन वृत्तसेवा

राजकुमार चौगुले : ॲग्रोवन वृत्तसेवा
कोल्हापूर : यंदाच्या हंगामात १५ नोव्हेंबरपर्यंत सुरू झालेल्या ७३ साखर कारखान्यांपैकी केवळ १८ कारखान्यांनी यंदा गाळप झालेल्या उसाची रिकव्हरीनुसार पूर्ण एफआरपी शेतकऱ्यांना दिली आहे. सात कारखान्यांनी ८० टक्क्यांपर्यंत एफआरपी दिली आहे. तर तब्बल ४८ कारखान्यांनी ५० टक्के ही एफआरपी अद्याप ऊस उत्पादकांना दिली नाही.

राज्यात १५ नोव्हेंबरअखेर २८ लाख टन उसाचे गाळप झाले. ९०६ कोटी रुपयांची एफआरपी शेतकऱ्यांना देय होती. यापैकी ४७० कोटी रुपयांची एफआरपी शेतकऱ्यांना देण्यात आली आहे. एकूण देय रकमेच्या ५१ टक्के रक्कम शेतकऱ्यांना गेल्या महिन्यात मिळाली आहे. अद्यापही ४४३ कोटी रुपयांची एफआरपीची रक्कम शेतकऱ्यांना थकीत आहे. ७३ पैकी ५५ कारखान्यांनी एफआरपीची रक्कम थकीत ठेवली आहे.

गळीत हंगाम सुरू होऊन एक महिन्याचा कालावधी झाला आहे. पावसामुळे एक नोव्हेंबर नंतरच राज्यात ऊसतोडणीला गती आली. यंदा एकरमी एफआरपीवरून राज्यभरात विविध शेतकरी संघटनांचे आंदोलन सुरू आहे. पश्‍चिम महाराष्ट्रातील काही कारखान्यांनी रिकव्हरीनुसार एफआरपी जाहीर केली आहे. बहुतांशी कारखान्यांनी मात्र एक रकमी एफआरपीकडे काणाडोळाच केल्याचे चित्र पहिल्या महिन्यातील अहवालानुसार आहे. महाविकास आघाडीने तुकड्यातील एफआरपी देण्याबाबत हालचाली सुरू केल्या होत्या. नव्या सरकारनेही या बाबत कोणतेही धोरण अवलंबले नाही. परिणामी, कारखान्यांनीही एक रकमे एफआरपी देण्याकडे दुर्लक्ष केले आहे.

कारखान्यांच्या यंदाच्या गळीत हंगामाकडे पाहिल्यास बहुतांशी कारखान्यांनी एकरकमी एफआरपी देण्याकडे दुर्लक्ष केल्याचे जाणवते. ज्या कारखान्यांचा हंगाम सुरू होऊन पंधरा दिवसांचा कालावधी लोटला आहे त्यांनी शेतकऱ्यांच्या नावावर रकमा जमा करण्यास प्रारंभ केला आहे. केवळ अठरा कारखाने वगळता अन्य कारखान्यांनी एफआरपी कमी स्वरूपातच शेतकऱ्यांना दिली असल्याचे चित्र आहे.


संघटनांचे एफआरपीसाठी आंदोलन सुरूच
साखर पट्ट्यातील कारखान्यामध्ये अजूनही शेतकरी संघटनांचे एक रकमी एफआरपीसाठी आंदोलन सुरूच आहे. बहुतांशी कारखान्यांनी रिकव्हरी कमी दाखवून एफआरपीची रक्कम जाहीर केल्याचा संघटनांचा आरोप आहे. पहिल्या महिन्यात तरी एकरकमी एफआरपीकडे अपवाद वगळता अगदी मातब्बर कारखान्यांनीही पाठ फिरवल्याचे दिसत आहे. एफआरपी थकीत असणारे बहुतांशी कारखाने सोलापूर, विदर्भ मराठवाडा या भागांतील आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT