ताज्या बातम्या

Satana APMC : सटाणा बाजार समितीत कांद्याचा ट्रॅक्टर चोरीचा प्रयत्न

मालेगाव रस्त्यावरील सटाणा बाजार समिती आवारातून सोमवारी (ता. १०) पहाटेच्या वेळी कांद्याचा ट्रॅक्टर चोरी करण्याचा प्रयत्न बाजार समिती सुरक्षारक्षकांच्या दक्षतेमुळे उघडकीस आला.

टीम ॲग्रोवन

सटाणा, जि. नाशिक : येथील मालेगाव (Malegaon) रस्त्यावरील सटाणा बाजार समिती आवारातून सोमवारी (ता. १०) पहाटेच्या वेळी कांद्याचा (Onion Producers Satana) ट्रॅक्टर चोरी करण्याचा प्रयत्न बाजार समिती सुरक्षारक्षकांच्या दक्षतेमुळे उघडकीस आला. या घटनेमुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

याबाबत संबंधित ट्रॅक्टरमालक शेतकरी धर्माजी केवळ भामरे (सावकी, ता. देवळा) यांनी सटाणा पोलिस ठाण्यात माहिती दिली. सोमवारी सकाळी सहाच्या सुमारास एक अज्ञात तरुण बाजार समिती आवाराबाहेर कांद्याचा ट्रॅक्टर घेऊन जात असताना प्रवेशद्वाराजवळ असलेले सुरक्षारक्षक गोपी साळे व शुभम पाल यांनी त्याच्याकडे ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्डची मागणी केली.

या वेळी या तरुणाने ट्रॅक्टर प्रवेशद्वाराच्या बाजूला उभा करून सटाणा-मालेगाव रस्त्यालगतच्या पुंडलिकनगरमधील नातेवाइकांकडून आधार कार्ड घेऊन येतो, असे सुरक्षारक्षकांना सांगितले.बराच वेळ होऊनही संबंधित तरुण परतलाच नाही.

यानंतर समितीच्या दुसऱ्या प्रवेशद्वाराजवळून संशयित तरुण दुचाकीवरून पळून गेल्याचे सुरक्षारक्षकांच्या लक्षात आले. लिलावा साठी वाहन पहाटे आणावेबाजार समिती आवारातील चोरीच्या घटनांच्या पार्श्‍वभूमीवर शेतकऱ्यांनी आपल्या ट्रॅक्टर ट्रॉली, तसेच इतर वाहनांवर स्वतःचे नाव, गाव व मोबाइल नंबरचा स्पष्ट उल्लेख करावा. लिलावासाठी वाहन मुक्कामी न आणता पहाटे घेऊन यावे, असे आवाहन सभापती पंकज ठाकरे, सचिव भास्कर तांबे यांनी केले

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Biological Crop Disease Management: जैविक पद्धतीने भुरी नियंत्रण यशस्वी करण्याच्या उपाययोजना

Organic Farming Success Story: सेंद्रिय, स्वावलंबी शेती पध्दतीचे साकारले मॉडेल

Artificial Intelligence: ‘एआय’ उडविणार झोप ...

India UK Trade Deal: व्यापार कराराचे फलित

Waste Management: कचऱ्याच्या ढिगाखाली गाडलेली व्यवस्था

SCROLL FOR NEXT