Onion Subsidy Agrowon
ताज्या बातम्या

Onion Subsidy : हजारो शेतकऱ्यांचे कांदा अनुदान अर्ज फेटाळले

Onion Market : यंदाच्या हंगामात कांदा उत्पादकांचे नैसर्गिक आपत्ती तसेच दरामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांना दिलासा म्हणून शासनाने अनुदान जाहीर केले.

Team Agrowon

Buldana News : यंदाच्या हंगामात कांदा उत्पादकांचे नैसर्गिक आपत्ती तसेच दरामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांना दिलासा म्हणून शासनाने अनुदान जाहीर केले. मात्र हे अनुदान मिळण्यासाठी प्रस्ताव दाखल केलेल्यांना तांत्रिक अटींचा फटका बसला आहे.

जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांचे अर्ज फेटाळण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. प्रामुख्याने जळगाव जामोद, संग्रामपूर तालुक्यांतील तीन हजारांवर अर्ज नामंजूर केले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा अपेक्षाभंग झाला आहे.

जिल्ह्यातील जळगाव जामोद बाजार समितीत सुमारे २२०० तर संग्रामपूरमध्ये ७०० वर अर्ज शेतकऱ्यांनी दिले. परंतु तांत्रिक अट पुढे करून अर्ज मंजूर करता येत नसल्याचे कारणय़ा शेतकऱ्यांना देण्यात आले.

अनुदानासाठी शेतकऱ्यांनी कांदा बाजार समित्यांत विकणे गरजेचे होते. परंतु जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये मुळातच कांद्याचे लिलाव होत नसल्याची स्थिती आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांना कांदा बाजार समितीत विकता आला नाही. तर दुसरीकडे या अर्जासोबत अशा खरेदी-विक्रीची पावती जोडणे आवश्यक होते. या कारणाने दाखल झालेले अर्ज एका झटक्यात नामंजूर करण्यात आले आहेत.

या भागात मुळात बाजार समित्यांत लिलाव होत नसताना शेतकऱ्यांनी पावतीची अट कशी पूर्ण करावी हा प्रश्‍न आहे. बाजार समित्यांकडे आलेले अर्ज तत्कालीन प्रशासकांनी नामंजूर केले आहेत. आता बाजार समितीत पदाधिकारी सत्तारूढ झाले आहेत. या मुद्यावर बाजार समिती शेतकऱ्यांसोबत आहे. अनुदानासाठी पाठपुरावा करणार आहोत.
- प्रसेनजित पाटील, सभापती, बाजार समिती, जळगाव जामोद
साडेचार एकरांतील कांद्यापैकी अडीच एकरातील कांदा विक्रीतून अवघे १६ हजार रुपये आले होते. तर कांदा काढणीचा खर्च १९ हजार रुपये झाला होता. अनेक शेतकऱ्यांनी तर दर मिळत नसल्याने कांदा पिकावर रोटाव्हेटर फिरवले. शेतकऱ्यांना मदतीची गरज असताना अटीवर बोट ठेवून अर्जच फेटाळले. याबाबत तहसीलदारांमार्फत शासनाला निवेदन पाठविले. १५ दिवसांत निर्णय न घेतल्यास आंदोलन छेडणार आहोत.
- समाधान दामधर, शेतकरी, जामोद, जि. बुलडाणा

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dr Kumar Saptarshi Tribute: डॉ. सप्तर्षींचा विचार अखंडपणे जपणे गरजेचेच शरद पवार यांचे आवाहन

Drone Pilot Training MOU: ड्रोन पायलट प्रशिक्षणासाठी ‘वनामकृवि’चा ‘सारथी’सोबत करार

Goat Deformity Case: गौंडगाव येथील बोकडामध्ये दिसली दुर्मीळ नैसर्गिक विकृती; पशुवैद्यकीय महाविद्यालयातील तज्ज्ञाकंडून तपासणी

Uddhav Thackeray: अंधभक्तांविरोधात देशभक्त जिंकले : उद्धव ठाकरे

Women Farmers Empowerment Council: राज्यात महिला शेतकरी सक्षमीकरण परिषद स्थापन

SCROLL FOR NEXT