Onion Rate
Onion Rate Agrowon
ताज्या बातम्या

Onion Rate : नगरला कांदादरात चढ-उतार कायम

Team Agrowon

नगर ः जिल्ह्यात कांदा लागवडीचे क्षेत्र वाढत असले तरी सातत्याने दरातील चढ-उताराने कांदा उत्पादक (Onion Producer) मात्र हतबल झाले आहे. मध्यंतरी पंधरा दिवस गावरान कांद्याचे दर (Onion Rate) वाढले. त्यानंतर आवक वाढताच पुन्हा कमी केले. सध्या लाल कांद्याला गावरानपेक्षा कांद्यापेक्षा अधिक दर मिळत आहे.

नगर जिल्ह्यात खरिपात वीस हजार हेक्टरपर्यंत कांदा लागवड झाली. यंदा रब्बीत ज्वारी कमी झाली असल्याने कांदा, गव्हाचे क्षेत्र वाढणार असल्याचा अंदाज आहे. गेल्या वर्षी रब्बी व उन्हाळी मिळून सुमारे दोन लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर कांदा लागवड झाली होती. आतापर्यंत किती लागवड झाली याची नोंदच कृषी विभागाकडे नाही. आठवड्याच्या अहवालातही कांदा लागवडीबाबत माहिती घेतली जात नसल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, आता खरिपाचा कांदा बाजारात येऊ लागला आहे. गेल्या वर्षभरापासून कांद्याचे दर कमीच आहेत. सध्या लाल कांद्याची दहा हजार गोण्यापर्यंत आवक होत असून २०० ते २२०० रुपये प्रती क्विंटल दर मिळत आहे. गावरान कांद्याची आवक आता कमी झाली आहे. सध्या दर लिलावाला ५२ हजार गोण्यांची आवक होत असून १०० ते १४५० रुपयांपर्यंत दर मिळत आहे. वर्षभर साठवून ठेवूनही गावरान कांद्यापेक्षा लाल कांद्याला दर अधिक मिळत असल्याने शेतकरी हतबल झाले आहे.

असे मिळत आहेत दर

लाल कांदा

एक नंबर कांदा १८०० ते २२००

दोन नंबर कांदा १२०० ते १८००

तीन नंबर कांदा ६०० ते १२००

चार नंबर कांदा २०० ते ६००

गावरान कांदा

एक नंबर कांदा १००० ते १४००

दोन नंबर कांदा ६५० ते १०००

तीन नंबर कांदा ३०० ते ६५०

चार नंबर कांदा १०० ते ३००

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय? कापूस, सोयाबीन, गहू, टोमॅटो यांचे दर काय आहेत?

Sugar Quota : मे महिन्यात साखरेचा कोटा वाढला, घाऊक बाजारात मंदीची लाट

SCROLL FOR NEXT